जळगाव शहर बनतेय पुन्हा ‘हॉटस्पॉट’  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona

सप्टेंबरपासून नियंत्रणात येत असलेल्या कोरोनाने या महिन्यात पुन्हा डोके वर काढले आहे. १ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची दररोजची संख्या वाढत आहे.

जळगाव शहर बनतेय पुन्हा ‘हॉटस्पॉट’ 

जळगाव : जिल्ह्यात आठवडाभरापासून कोरोनाचा संसर्ग वाढतच असून जळगाव शहर पुन्हा ‘हॉटस्पॉट’ बनत चालले आहे. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात १५२ रुग्ण आढळून आले, पैकी तब्बल ७९ रुग्ण जळगाव शहरातील आहेत. 
सप्टेंबरपासून नियंत्रणात येत असलेल्या कोरोनाने या महिन्यात पुन्हा डोके वर काढले आहे. १ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची दररोजची संख्या वाढत आहे. गुरुवारी १६९ रुग्ण आढळून आल्यानंतर आज पुन्हा १५२ नवे बाधित आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५८ हजार १७३ झाली आहे. तर दिवसभरात केवळ ३९ रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा ५६ हजार २४ झाला आहे. रुग्ण वाढत असताना दोन दिवसांपासून एकाही मृत्युची नोंद नाही, हीच तेवढी दिलासादायक बाब आहे. शुक्रवारी सुमारे १२०० चाचण्यांचे अहवाल प्राप्त झालेत. 
 
जळगावात धोका 
जळगाव शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक होण्याचा धोका वाढतोय. शहर पुन्हा हॉटस्पॉट बनण्याच्या अवस्थेत आहे. गुरुवारी ८४ व शुक्रवारी पुन्हा ७९ नवे रुग्ण शहरात आढळून आले. जानेवारीअखेर शंभरापर्यंत ॲक्टिव रुग्ण घटल्यानंतर शहरातील आजची सक्रिय रुग्णांची संख्या ३८६ झाली आहे. 
 
असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर ७९, भुसावळ १४, चाळीसगाव २२, अमळनेर ७, पारोळा ५, एरंडोल ३, पाचोरा ४, मुक्ताईनगर २, जामनेर ५, बोदवड ३, रावेर, यावल, धरणगाव प्रत्येकी १, अन्य जिल्ह्यातील ४.

loading image
go to top