esakal | कोरोनाचा विस्‍फोट सुरूच; बाधितांचा आकडा पाचशेच्‍या घरात

बोलून बातमी शोधा

corona}

जळगाव जिल्‍ह्‍यातील कोरोना बाधितांचा रेशीओ काहीसा कमी झालेला पाहण्यास मिळत होता. मात्र मागील दहा- बारा दिवसांपासून बाधितांच्या आकड्याचा आलेख वरच्या दिशेने जात आहेत.

कोरोनाचा विस्‍फोट सुरूच; बाधितांचा आकडा पाचशेच्‍या घरात
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आज देखील वाढलेला आहे. आठवडाभरापासून दुसऱ्या टप्प्यातील सुरू असलेला कोरोनाचा विस्‍फोट आज सर्वाधिक राहिला असून मागील चोवीस तासांत जिल्ह्यात तब्बल ४९२ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव शहरासह चाळीसगाव आणि चोपडा तालुके हॉटस्‍पॉट बनले आहेत.
जळगाव जिल्‍ह्‍यातील कोरोना बाधितांचा रेशीओ काहीसा कमी झालेला पाहण्यास मिळत होता. मात्र मागील दहा- बारा दिवसांपासून बाधितांच्या आकड्याचा आलेख वरच्या दिशेने जात आहेत. रोज आढळून येणाऱ्या बाधितांच्या तुलनेत बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या आता कमी झाली आहे. यामुळे ॲक्‍टिव्ह रूग्‍ण वाढत आहेत. अर्थात जिल्‍ह्‍यात आज आढळून आलेल्‍या एकूण बाधितांमुळे आतापर्यंत ६१ हजार ७६६ वर आकडा पोहचला आहे. हा वाढता आकडा आता चिंता वाढविणारा आहे.

जळगावनंतर चोपडा, चाळीसगावात सर्वाधिक
मागील चोवीस तासात जिल्ह्यात ४९२ बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तर १४४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बाधितांचा आकडा रोजचा वाढता असून, यात जळगाव शहरात सर्वाधित रूग्‍ण आढळून येत आहेत. आजच्या अहवालानुसार जळगाव शहरात १२४ बाधीत रूग्ण आढळले. या खालोखाल चोपडा तालुक्यात ७३, चाळीसगाव तालुक्यात ८० आणि जळगाव तालुक्यात ५३ रूग्‍ण आढळून आले आहेत.

असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर १२४, जळगाव ग्रामीण ५३, चाळीसगाव ८०, अमळनेर २, जामनेर ३७, भुसावळ २७; मुक्ताईनगर-१८, बोदवड-७; एरंडोल-१७; धरणगाव-१३; रावेर-१८; पाचोरा ५, भडगाव ३, पारोळा-८; यावल २ आणि इतर जिल्‍ह्‍यातील ५ असे रूग्ण आढळून आले आहेत.