दिलासा..सलग तिसऱ्या दिवशी मृत्यू नाही 

राजेश सोनवणे
Friday, 25 December 2020

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र असताना काही दिवसांपासून नव्या बाधितांची संख्या हळूहळू वाढते आहे.

जळगाव : जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही, ही समाधानकारक बाब असली तरी बरे होणारे कमी व नवे बाधित जास्त, असे चित्र कायम आहे. आजही ३५ नवे रुग्ण आढळून आले तर २७ जण बरे झाले. 
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र असताना काही दिवसांपासून नव्या बाधितांची संख्या हळूहळू वाढते आहे. गुरुवारी तब्बल ७१ नवे रुग्ण आढळल्यानंतर आज थोडा दिलासा मिळत ३५ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५५ हजार ५९७ झाली आहे. तर २७ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा ५३ हजार ८५१ झाला आहे. 

चाचण्या वाढविल्या 
गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यातील चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. गुरुवारी अडीच हजारांवर अहवाल प्राप्त झाले होते, शुक्रवारी प्राप्त अहवालांची संख्या जवळपास तेवढीच होती. त्यात जळगाव शहरातून १०, भुसावळ, चोपडा व चाळीसगाव तालुक्यात ४, अमळनेर, यावल, जामनेर तालुक्यात प्रत्येकी २, मुक्ताईनगर, पारोळा तालुक्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news coronavirus update no death last three days