esakal | शहरापासून दूर असलेल्‍या वृद्धाश्रमातही पोहचला कोरोना

बोलून बातमी शोधा

corona}

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमालीचा वाढत आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून दररोजचे बाधित वाढत असून गेल्या आठवडाभरात हा आलेख दररोज दोन-तीनशेच्या घरात असताना शुक्रवारी नवीन ५४८ रुग्ण समोर आले.

शहरापासून दूर असलेल्‍या वृद्धाश्रमातही पोहचला कोरोना
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट सुरुच आहे. संसर्ग अधिक वेगाने पसरत असून गुरुवारी जिल्ह्यात नव्या रुग्णांचा आकडा साडेपाचशेवर गेला. त्यात एकट्या जळगाव शहरातील अडीचशे रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. विशेष म्‍हणजे शहरापासून दूर असलेल्‍या मातोश्री वृद्धाश्रमातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमालीचा वाढत आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून दररोजचे बाधित वाढत असून गेल्या आठवडाभरात हा आलेख दररोज दोन-तीनशेच्या घरात असताना शुक्रवारी नवीन ५४८ रुग्ण समोर आले. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा ६२ हजार ६५० झाला आहे. तर गेल्या २४ तासांत दोघांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या चौदाशेच्या टप्प्यात म्हणजे १३९६ झाली आहे. दिवसभरात २४५ रुग्ण बरे झाले असून एकूण बरे झालेल्यांचा आकडा ५७ हजार ६४९वर पोचला आहे. 
 
जळगाव शहरात घराघरात संसर्ग 
जळगाव शहरातील स्थिती दिवसेंदिवस भीषण होत आहे. दररोज शंभरावर आढळून येणारे रुग्ण आज वाढून २४८वर पोचले. शहरातील घराघरात रुग्ण आढळून येत असून कुटुंबच्या कुटुंब बाधित होत असल्याचे समोर येत आहे. शहरातील १५७ रुग्ण आज बरे झाले. 
 
वृद्धाश्रमातील वृद्धही बाधित 
केशव स्मृती प्रतिष्ठान संचालित मातोश्री वृद्धाश्रमात कोरोनाने शिरकाव केला असून बुधवारी १८ वृद्ध बाधित आढळल्यानंतर आजही पुन्हा ५ ज्येष्ठांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. 

जिल्ह्यातील स्थिती अशी 
जिल्ह्यातही चोपडा, भुसावळ, जामनेर, चाळीसगाव आदी तालुक्यांत संसर्ग वाढतोय. जळगाव ग्रामीण ६,भुसावळ ४६, अमळनेर २, चोपडा ८३, पाचोरा १, धरणगाव ८, एरंडोल ३, जामनेर ४५, रावेर २४, पारोळा १७, चाळीसगाव ४५, मुक्ताईनगर १८, अन्य जिल्ह्यातील २ असे रुग्ण आढळून आले. बोदवड, यावल व भडगाव तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.