esakal | सहा तालुके निरंक तरी बाधितांची फिफ्टी
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus

जिल्ह्यातील कोरोना व्हायरस अजूनही संकटात नेणारा आहे. बाधित होणाऱ्यांचा आकडा कमी दिसत असला तरी जिल्‍ह्‍यासाठी ही चिंताजनक बाब आहे.

सहा तालुके निरंक तरी बाधितांची फिफ्टी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्‍ह्‍यातील कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. नवीन बाधित रूग्‍णांची संख्या वाढत आहे. आजच्या अहवालानुसार जिल्‍ह्‍यातील सहा तालुके निरंक राहिले असले तरी नवीन बाधितांची संख्या ५२ आहे. तर एका रूग्‍णाचा उपचारा दरम्‍यान मृत्‍यू झाला.

जिल्ह्यातील कोरोना व्हायरस अजूनही संकटात नेणारा आहे. बाधित होणाऱ्यांचा आकडा कमी दिसत असला तरी जिल्‍ह्‍यासाठी ही चिंताजनक बाब आहे. जिल्‍हा प्रशासनाकडून प्राप्त अहवालानुसार आज दिवसभरात ५२ नवीन बाधित आढळल्‍याने एकुण बाधितांची संख्या ५६ हजार २७७ झाली आहे. त्यापैकी ५४ हजार ४४६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर ४९४ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जळगाव शहरातील १ रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकुण १ हजार ३३७ रूग्ण बाधित आढळून आले आहे.हे

असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर १४, भुसावळ १४, अमळनेर २, चोपडा १४, पाचोरा २, एरंडोल १, जामनेर १, रावेर १, चाळीसगाव २, बोदवड १ असे एकुण ५२ रूग्ण आढळून आले आहे. तर  जळगाव ग्रामीण, भडगाव, धरणगाव, यावल, पारोळा, मुक्ताईनगरमध्ये एक देखील रूग्‍ण आढळून आला नाही.