esakal | मैत्रीचा विश्‍वासघात..मित्राच्‍या पत्‍नीवर अत्‍याचार; व्हिडीओ असल्‍याचे सांगून बोलावले

बोलून बातमी शोधा

Atrocities on married women
मैत्रीचा विश्‍वासघात..मित्राच्‍या पत्‍नीवर अत्‍याचार; व्हिडीओ असल्‍याचे सांगून बोलावले
sakal_logo
By
टिम इ सकाळ

चाळीसगाव (जळगाव) : पतीचा मित्र म्‍हणून नेहमी घरी येणे जाणे होते. पण मैत्रीचा विश्‍वासघात करत मित्राच्याच पत्‍नीला तुझे अश्‍लिल व्हिडीओ असल्‍याचे सांगून ते डिलीट करायचे असतील तर भेटायचा ये; असे सांगून बोलावले आणि विवाहितेवर अत्‍याचार केल्‍याची घटना उघडकीस आली.

चाळीसगाव शहरातील २२ वर्षीय विवाहितेवर पतीच्या मित्रानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी (ता.२९) रात्री घडला. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाट रोड परिसरात पती, पत्नी व तीन मुलांसह वास्तव्यास आहेत. भंगारचा व्यावसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीतो. त्‍यांच्याच परिचयातील मित्र नेहमी घरी येत असे.

पती बाहेर गेला अन्‌ साधला डाव

गुरूवारी (ता.२९) रात्री आठच्या सुमारास मित्र भांडी आणण्यासाठी घरा बाहेर गेला होता. याच दरम्‍यान त्याचा मित्र निजाम शेख जकीउद्दीन मुजावर (रा. कादरीनगर) याने त्याच्या पत्नीला फोन करून तुझे अश्‍लीत व्हिडीओ व फोटो माझ्या मोबाईलमध्ये आहेत. ते डिलीट करायचे असतील तर पाण्याच्या टाकीच्या पाठीमागील शेतात ये असे धमकावत विवाहितेला बोलावले.

मित्र आल्‍याने पाहून त्‍याने ठोकली धुम

संबंधीत विवाहित महिला रात्री साडेआठच्या सुमारास निजाम शेख याने बोलाविलेल्‍या ठिकाणी गेली. त्‍यावेळी निजाम शेख याने मोबाईल न दाखवता महिलेवर अत्याचार केला. याच दरम्‍यान विवाहितेचा पती आल्‍याने मुजावरने तेथून पलायन केले. यानंतर पिडीतेने लागलीच पतीसह शहर पोलिस स्टेशनला जात फिर्याद दिली. यानुसार निजाम शेख जकीउद्दीन मुजावर याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.