esakal | मुलीचे फोटो केले व्हायरल; त्‍यांना कंटाळून गाव सोडले पण..

बोलून बातमी शोधा

girl torture

मुलीचे फोटो केले व्हायरल; त्‍यांना कंटाळून गाव सोडले पण..

sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : धरणगाव शहरातच बालाजी मंदिरा जवळील परिसरात वास्तव्यास असलेल्या दाम्पत्याची सोळा वर्षीय मुलगी गावगुंडानी पळवून नेली आहे. सततच्या छेडखानीला त्रासलेल्या मुलीने पालकांना सांगीतले, गावात बदनामी झाली अखेर जातीय तेढ नको म्हणुन गाव सोडले. तर पाचोरा तालुक्यातून मुलीचे अपहरण केल्याचा प्रकार घडला. वेळीच धरणगाव पोलिसांनी घटनेची तक्रार घेत कारवाई केली असती तर, आमची मुलगी आज घरी सुखरुप असती अशी कैफीयत मुलीच्या पित्याने मांडली.

धरणगाव शहरातील मुळ रहिवासी सोळावर्षीय बालिकेला गावातील गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने अपहरण करुन नेले आहे. तक्रारदार पित्या सोबत आज धरगणावातील उभयीत समुदायातील मंडळी पेलिस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी जळगावी आले होते. स्थानिक पोलिस ठाण्यात संशयीतांच्या कुटूंबीयांची चलती असल्याने काहीही तक्रार केल्या तरी उपयोग होत नाही.

मुलीसोबतचे फोटो केले व्हायरल

गेल्या आठ महिन्यापुर्वी एका मुलीची छेड काढल्याने तीने प्रतिक्रार केला म्हणुन तिला याच टोळक्याने गावात बदनाम करुन सोडले. मोबाईलवर मुलीसोबतचे फोटो व्हायरल करुन बदनामी केली होती. असा प्रकार आपल्या सोबत होवु नये म्हणुन गाव सोडणाऱ्या कुटूंबातील अल्पवयीन मुलगी या टोळक्याने पळवल्याचे तक्रार निवेदन मुलीच्या पित्याने जिल्‍हा पोलिस अधीक्षकांना दिले आहे. त्यात टोळीचा म्होरक्या राहुल संजु महाजन, निलेश अशोक महाजन, भोलू बापू महाजन, सोनू राजु पच्ची पैलवान, भगवान राजपुत (सर्व रा. धरणगाव)अशांचा समावेश आहे.

गावसोडले तरी..

साधारण ५ महिन्यापुर्वी मुलीची छेड काढली म्हणुन तिच्या पित्याने धरणगाव पोलिसांत तक्रार केली. मात्र गावातील वजनदार मंडळींनी गुन्हा दाखल होवु दिला नाही. गावात जातीय सौदार्ह्य अबाधीत राहवे यासाठी मुलीच्या पित्याने राहते घर नातेवाईकांना सोपवुन गोराडखेडा (ता.पाचोरा) येथे बस्तान हलवले. मात्र, या टोळक्याने तेथून मुलीला पळवून नेल्याने आम्ही हतबल झालोय अशी उध्वीघ्न प्रतिक्रीया आई-वडीलांनी नोंदवली.