esakal | आईदेखत मुलीला नेले पळवून; तरूणाचा अत्‍याचार

बोलून बातमी शोधा

girl torture
आईदेखत मुलीला नेले पळवून; तरूणाचा अत्‍याचार
sakal_logo
By
टिम इ सकाळ

वरणगाव (जळगाव) : येथून जवळच असलेल्या विल्हाळे येथील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले व नशिराबाद येथे एका शेतातील झोपडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी तरुणाविरुद्ध वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

विल्हाळ येथील मजुराची १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी लहानपणापासून हिवरखेडा (ता. जामनेर) तिच्या आजीच्या घरी राहून शिक्षण घेते. ती तीन महिन्यांपूर्वी तिच्या आई, वडिलांकडे विल्हाळे येथे आली होती. शनिवारी (ता. २४) रात्री आठच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ‘पोटात दुखत आहे, बाहेर जाऊन येते’, असे सांगून घराबाहेर पडली. त्यावेळी ती पुढे निघाली व त्या वेळी तिची आई तिच्या मागे गेली. मात्र, त्यावेळी बाहेरील रोडवरून एक मोटरसायकल जवळ येवून थांबली. त्या मोटरसायकलवरील दोन व्यक्तींपैकी एकाने मुलीस उचलून गाडीवर बसवून नेले.

शेतात घेवून गेले

मुलीच्या वडिलांनी सांगितले, की संशयित कृष्णा गायकवाड (वय १७, रा. हिवरखेडा) हा नेहमी मुलीस लग्न करण्याविषयी सांगत होता. त्यावरून अधिक तपासात त्याने मुलीला लग्नासाठी फूस लावून पळवून नेले व नशिराबाद येथील एका शेतातील झोपडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केले. तसेच रवीण खाटीक याने त्यास पळून जाण्यासाठी मदत करून त्यांना मोटरसायकलवर बसवून नशिराबादपर्यंत नेऊन सोडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसात ‘पोस्को’तंर्गत गुन्हा दाखल झाला आहे.