सावधान..‘बीएसएनएल’च्‍या नावाने येवू शकतो फोन; एकाला साठ हजाराचा गंडा

सावधान..‘बीएसएनएल’च्‍या नावाने येवू शकतो फोन; एकाला साठ हजाराचा गंडा
cyber crime
cyber crimecyber crime

जळगाव : मुंबई येथून बीएसएनएल केअर सेंटरमधून बोलत असल्याचे सांगत तुमच्या मोबाईल नंबरचे केवायसी अपडेट करण्याचा बहाण्याने संजय भिमराव पाटील (वय ५२ रा. मुक्ताईनगर, जळगाव) यांची ६० हजार १८५ रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाली. सदर प्रकार १४ जूनला घडली असून याप्रकरणी आज जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (cyber-crime-bsnl-center-call-60-thousand-cash-fraud)

जळगाव शहरातील मुक्ताईनगर येथील (प्लॉट नं २९) मुक्ताईनगर येथे संजय भिमराव पाटील हे पत्नी व तीन मुलींसह वास्तव्यास आहे. ते शिरसोली रोडवरील जैन हिल्स येथे टेलीफोन ऑपरेटर म्हणून नोकरीला आहे. संजय पाटील हे १४ जूनला घरी असतांना दुपारी साडेबाराला ८३८९०२९४८१ या क्रमांकावरुन एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. बीएसएनएल सर्व्हिस केअर सेंटर मुंबई येथून बोलत असल्याचे मोबाईल नंबरचे केवायएसी अपडेट करायचे असल्याचे सांगून दहा रुपयाचे रिचार्ज करायला सांगितले.

रिचार्ज केल्‍याचा ओटीपी सांगितला अन्‌

पाटील यांनी अनोळखी व्यक्तीवर विश्‍वास ठेवून रिचार्ज केल्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक अनोळखी व्यक्तीला सांगितला. ओटीपी क्रमांक सांगताच २ तासानंतर संजय पाटील यांच्या खात्यातून सुरुवातीला ३० हजार, त्यानंतर १९ हजार ९०० रुपये, परत १० हजार १६५ असे एकूण ६० हजार १८५ रुपये अनोळखी व्यक्तीने वळते करुन घेतले. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर संजय पाटील यांनी आज जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन ८३८९०२९४८१ हा क्रमांक असलेल्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अजित पाटील हे करीत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com