ऑक्सिजन पाईपलाइनसाठी ९० हजारांची मदत; माजी विद्यार्थ्यांचे दातृत्व

ऑक्सिजन पाईपलाइनसाठी ९० हजारांची मदत; माजी विद्यार्थ्यांचे दातृत्व
ऑक्सिजन पाईपलाइनसाठी ९० हजारांची मदत; माजी विद्यार्थ्यांचे दातृत्व

धानोरा (जळगाव) : कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचे महत्त्व समजल्यानंतर लोकसहभागातून अनेक कामे होत आहेत. धानोरा (ता. चोपडा) आरोग्य केंद्रातही सेंट्रल पाईपलाइनद्वारे (Oxygen central line dhanora health center) किमान १२ बेडसाठी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून तरुण सोशल मीडियाद्वारे प्रचार करत लोकवर्गणी जमा केली जात आहे. त्याला प्रतिसाद धानोरा माध्यमिक विद्यालयातील (Secondary school student dhanora help) माजी विद्यार्थ्यांच्या बॅचने ९० हजारांचे साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. (dhanora-health-center-oxygen-pipe-line-help-in-primary-school-Ex-student)

ऑक्सिजन पाईपलाइनसाठी ९० हजारांची मदत; माजी विद्यार्थ्यांचे दातृत्व
World No Tobacco Day.. ‘कॅन्सर’वर मात करून फुलविले आयुष्य

दहावीच्या त्‍या बॅचमधून ३० हजार

धानोरा येथील माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या १९९५/९६च्या बॅचमधील विद्यार्थांनी एकत्रित येऊन ३० हजार रुपयांच्या मदतीसह ६० हजार किंमतीचे तिन जब्बो ऑक्सिजन सिलिंडरउपलब्ध करून देणार आहेत. त्याच्या या दातृत्वाने गावात त्यांचे कौतुक केले जात आहे.

लोकसहभागातून सुरवात

लोकसहभातून सेंट्रल ऑक्सिजन पाईपलाईनने जोडण्यासाठी लोकसहभागातून निधी संकलित करून प्रत्यक्ष कामास सुरवात केली आहे. बॅचचे प्रतिनिधी म्हणून चंद्रशेखर पाटील, अजित तडवी, आनंद पाटील, हिराचंद तिवारी, अमरदीप गुजर यांनी ३० हजारांचा धनादेश पोलीस पाटील दिनेश पाटील, उपसरपंच विजय चौधरी, हितेंद्र पाटील यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी आरोग्य केंद्राचे डॉ. शेख, भारती सोनवणे, प्रवीण ठाकूर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com