कोरोनाने मृत कर्मचाऱ्यास मिळाले पन्नास लाखाचे अनुदान

health
health
Updated on

धरणगाव (जळगाव) : तहसील कार्यालयातील लिपिक अनिल हिवराळे यांचा ऑगस्ट २०२० मध्ये कोरोना बाधित झाल्यामुळे मृत्यू झाला होता. पण त्‍यांच्या मृत्‍यूनंतर उघड्यावर पडलेल्‍या परिवाराला मदत मिळावी याकरीता शासकिय स्‍तरावर पाठपुरावा करून पन्नास लाखाचे अनुदान मिळवून दिले.

तहसील कार्यालयातील लिपीक मयत हिवराळे यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या धोरणाप्रमाणे कोरोना बाधित कर्मचाऱ्याच्या मृत्यूसाठी असलेल्या पन्नास लाख रुपयाची आर्थिक मदत मिळावी; यासाठी तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करून मयताच्या कुटुंबीयांना मोठा आधार दिला. हिवराळे यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये मिळाले आहेत.

तातडीने प्रस्‍ताव सादर
तहसिल कार्यालय धरणगांव येथे कार्यरत मयत लिपीक अनिल श्रीराम हिवराळे यांचे ६ ऑगस्ट २०२० रोजी कोविड-19 कर्तव्य पार पाडतांना कोरोनामुळे निधन झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्या अनुषंगाने सदर लिपीक कोरोना बाधित होवुन मृत्यु पावल्यामुळे तहसिलदार देवरे यांनी तात्काळ संबंधित लिपीकाच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन करुन एका आठवड्याच्या आत जिल्हाधिकारी यांच्याकडे सानुग्रह अनुदान
मिळण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची तात्काळ दखल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घेवुन शासनाला सदर प्रस्ताव सादर केला होता. 

मुलांना अनुकंपावर नोकरीसाठी प्रयत्‍न
मयत कर्मचारी अनिल हिवराळे यांचे पश्चात पत्नी प्रतिभा अनिल हिवराळे (वय 40), एक मुलगा अनुरत्न (वय 17), एक मुलगी प्रांजल (वय 12) व आई गयाबाई श्रीराम हिवराळे (वय 72) असा परिवार आहे. सदर सानुग्रह अनुदान हे कुटूंबियांच्या व मुलांच्या भवितव्यासाठी फायदेशिर ठरेल अशी माहिती तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी दिली आहे. तसेच मुलाचे नांव जिल्हाधिकारी यांना अनुकंपतत्वावर नोकरी मिळणेसाठी देखिल पाठविण्यात आल्याची तहसिलदार यांनी सांगितले.

घरातील करता पुरुष मयत झाल्याने उध्वस्त झालेल्या कुटुंबाला कोविड 19 चे सानुग्रह अनुदान शासनाने त्वरीत पारीत करुन दिल्यामुळे व जिल्हाधिकारीअभिजित राऊत यांनी स्वत:वैयक्तीक लक्ष दिल्यामुळे दिवंगत कर्मचारी यांच्या कुटूंबियास मोठा हातभार लागला आहे. त्याबददल शासनाचे मनपुर्वक आभार.शासनाच्या त्वरित कार्यवाही मुळे कर्मचारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.

- नितीनकुमार देवरे, तहसिलदार धरणगांव

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna River sand mafia latest news
Maharashtra government decides to conduct 'e-Peek Pahani' through appointed assistants from July 15
Khandesh Expressway latest update
ACB Nashik bribery trap operation
Marathi News Esakal
www.esakal.com