सुडाच्या राजकारणावर खडसे काय म्‍हणाले; महाजनांच्या आरोपावरील उत्‍तर वाचा

कैलास शिंदे
Sunday, 20 December 2020

एकनाथराव खडसे यांचे नाव न घेता आरोप केला होती कि, हे सुडाचे राजकारण आहे. तक्रारदारामागचा मुळ सुत्रधार वेगळाच आहे. त्यावर आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले, कि महाजन यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याशी आपला कोणताही संबध नाही,

जळगाव : गिरीश महाजन यांच्या विरूध्द मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे, आपल्या विरूध्द हे सुडाचे राजकारण असल्याचा आरोप त्यांनी केला, त्याला खडसे यांनी उत्तर देत म्हटले आहे की, महाजनांविरूध्द गुन्हा दाखल करण्याशी आपला कोणताही संबध नाही,त्यामुळे सुडाचे राजकारण आहे, कि नाही मला माहित नाही,मात्र माझ्या विरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला होता. न घडलेल्या प्रकरणातही केवळ त्यांच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला आहे त्या सुडाच्या राजकारणाचा मी बळी ठरलो आहे, त्याचे परिणाम मी आजही भोगतो आहे. 
माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात ॲड.विजय पाटील यांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महाजन यांनी पत्रकार परिषद घेवून एकनाथराव खडसे यांचे नाव न घेता आरोप केला होती कि, हे सुडाचे राजकारण आहे. तक्रारदारामागचा मुळ सुत्रधार वेगळाच आहे. त्यावर आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले, कि महाजन यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याशी आपला कोणताही संबध नाही, मराठा विद्याप्रसारक संस्थेत आपण कधीही गेलेलो नाही, त्यामुळे त्या वादाशी संबध असण्याचे कारण नाही. त्यामुळे यात सुडाचे राजकारण असेल असे आपल्याला वाटत नाही. 

सुडाच्या राजकारणाचा मी बळी 
सुडाचे राजकारण आपल्याविरूध्द त्यावेळी करण्यात आले होते. मात्र त्यावेळी आपण ते सहन केले. माझ्या विरोधात अंजली दमानिया यांनी मुंबईत विनयभंगाची खोटी तक्रार तक्रार दाखल केली,गुन्हा मुक्ताईनगरात घडल्याचे दाखवून मुंबईत गुन्हा दाखल केला, विशेष म्हणजे हा गुन्हा दाखल करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले,.आपण त्यांना विचारल्यावर त्यांनी फडणवीस यांनी मान्यही केले आपण हा गुन्हा मागे घेवू असेही त्यांनीच सांगितले.आजही आपण त्या गुन्ह्याच्या तारखेवर जात आहोत. त्यानंतर मनीष भंगाळे यांने आपल्यावर गुन्हे दाखल केले त्यावेळी आपण राज्याच्या मंत्री मंडळात क्रमांक दोनचा मंत्री होतो, भंगाळे सारख्या एका साध्या व्यक्तीने आपल्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्या पाठीमागे कोण होते. हे सर्वानाच माहित आहे. एक नव्हे आपल्यावर अकरा गुन्हे दाखल आहेत. त्यावेळी सुडाचे राजकारण कोण करीत होते, हे सर्वानाच माहिती आहे. त्या राजकारणाचा आपण बळी ठरलो आहोत. 

सरकार माझे ऐकत असेल तर आनंद 
महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा मी सुत्रधार असल्याचा आरोप त्यांनी नाव न घेता केला आहे. याबाबत बोलतांना खडसे म्हणाले,मी आता शासनावर दबाव कसा आणू शकतो, आजच्या स्थितीत मी साधा आमदारही नाही. त्यामुळे राज्य सरकार माझ ऐकेल एवढी ताकदही माझी नाही. जर सरकार माझं ऐकत असेल तर मला आनंदच आहे, त्या ताकदीचा उपयोग मी जनतेच्या कामासाठी करून घेईन. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news eknath khadse statment bjp goverment girish mahajan devendra fadanvis