esakal | पहाटेचा थरार..विद्युत तार तुटली झोपडी थोडक्‍यात वाचली, पण ३५ बकऱ्यांचा मृत्‍यू

बोलून बातमी शोधा

goat dead

सकाळी सातच्या सुमारास मेन लाईनच्या खांबावरील क्लँम तुटल्यामुळे विजेचा तार खाली पडली. यात विद्युत प्रवाह चालू होता. ही तार झोपडीच्या बाजूला पडली.

पहाटेचा थरार..विद्युत तार तुटली झोपडी थोडक्‍यात वाचली, पण ३५ बकऱ्यांचा मृत्‍यू
sakal_logo
By
राजेंद्र पाटील

नांद्रा (जळगाव) : उन्हाळ्याचे दिवस असल्‍याने शेळ्या- बकऱ्या शेतात बसविले जातात. त्‍यानुसार भिल्‍ल समाजातील व्यक्‍तीने दीडशे बकऱ्या गावातील रवींद्र देशमुख यांच्या शेतात बसविल्‍या होत्‍या. पण आज पहाटे मोठा अनर्थ झाला. चालू लाईनवरील विद्युत तार अचानक तुटून पडली. यात ३५ बकऱ्यांचा मृत्‍यू झाला.
राणीचे बांबरूड येथील राजाराम सखाराम भिल्‍ल यांच्या दीडशे बकऱ्या जुन्ने शिवारात रवींद्र देशमुख यांच्या शेतात बसविण्यात आल्‍या आहेत. येथेच बकऱ्यांसाठी वेगवेगळे तार कंपाउंड तयार करण्यात आले आहे. तर त्‍याच्याच बाजूला राहण्यासाठी दोन झोपड्या तयार करण्यात आल्‍या आहेत. याच ठिकाणाहून हाय होल्‍टेजची विद्युत लाईन गेलेली आहे.

अनर्थ टळला
राजाराम भिल्‍ल यांच्या झोपड्यांच्यावरून हाय होल्‍टेजची विद्युत लाईन गेलेली आहे. सकाळी सातच्या सुमारास मेन लाईनच्या खांबावरील क्लँम तुटल्यामुळे विजेचा तार खाली पडली. यात विद्युत प्रवाह चालू होता. ही तार झोपडीच्या बाजूला पडल्‍याने मोठा अनर्थ टळला. तार झोपडीवर पडली असता स्‍पार्किंगमुळे झोपडीला आग लागण्याची शक्‍यता होती. शिवाय सकाळी भिल्‍ल परिवाराची बाहेर धावपळ सुरू असल्‍याने शॉक लागून काही घटना घडण्याची शक्‍यता होती. परंतु, सुदैवाने हा अनर्थ टळला.‍

बकऱ्यांचा होरपळून मृत्‍यू
विद्युत तार बकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्‍या तारेच्या कपांउंड आणि बकऱ्यांवर पडली. यामुळे संपुर्ण कंपाउंडमध्ये विद्युत प्रवाह गेल्‍याने शेतातील ३५ बकऱ्यांचा होरपळून मृत्‍यू झाला. बकऱ्या विकून उदरनिर्वाह करत होते. अशात ३५ बकऱ्यांचा मृत्‍यू झाल्‍याने मोठे नुकसान झाले आहे.

संपादन- राजेश सोनवणे