esakal | ऑक्सीजन प्लांटसह लस उपलब्ध व्हावी; माजी मंत्र्यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन

बोलून बातमी शोधा

gulabrao patil
ऑक्सीजन प्लांटसह लस उपलब्ध व्हावी; माजी मंत्र्यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन
sakal_logo
By
टिम इ सकाळ

पारोळा (जळगाव) : एरंडोल व पारोळा मतदार संघात ऑक्सीजन अभावी मृत्युदरात मोठी वाढ झाली. यासाठी एरंडोल व पारोळा तालुक्यात ऑक्सीजन प्लांट उभारण्यात आला. तर रुग्णांना दिलासा मिळेल. तसेच तालुक्यात लसीकरणाचा मंदावलेल्‍या वेगामुळे अनेकांना वंचित रहावे लागत आहे. रेमडेसिविर, रुग्णालयात डॉक्टरांची संख्या व मुबलक औषधीसाठा उपलब्ध व्हावा; यासाठी माजी मंत्री डॉ. सतीष पाटील यांनी पालकमंत्री डॉ. गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली.

तामसवाडी (ता.पारोळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी निवेदन दिले. यात एरंडोल व पारोळा तालुक्यातील कोरोना रुग्णांबाबत माहिती देत सध्या दोन्ही तालुक्यात ऑक्सीजनचा तुटवडा भासत आहे. यामुळे सिलेंडर भरण्यासाठी जळगाव व धुळे जावे लागत आहे. रुग्णांना वेळेवर ऑक्सीजन मिळत नसल्याने रुग्ण दगावत आहे. त्यामुळे तालुक्यात प्लांट उभारला तर निश्चितच दिलासा मिळेल. तसेच रेमडेसिविरचे वितरण अल्प प्रमाणात होत आहे. यात वाढ व्हावी. कुटीर रुग्णालयात एकच डॉक्टर असल्याने वेळेवर रुग्ण तपासणी होत नाही. परिणामी रुग्णांना तातकळत रहावे लागते.

लसींचीही मागणी

कोरोनावर सध्या तरी लस हा एकमेव पर्याय असल्याने तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातसह ग्रामीण रुग्णालयात लस उपलब्ध झाल्या तर नागरिकांना दिलासा मिळेल. याबाबत आपल्या स्तरावरुन आदेश व्हावेत; अशी मागणी डॉ. सतीष पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेकडे केली. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ याबाबत जिल्हाधिकारी यांचेशी भ्रमणध्वनीवरुन चर्चा करत दोन्ही तालुक्यातील प्रश्न सोडविणेबाबत सुचना केल्या.

नव्या २० बेडसाठी एक लाखाची मदत करणार : डॉ. सतीष पाटील

कुटीर रुग्णालयात २० बेड आहेत. परंतु रुग्णसंख्येमुळे ते अपुर्ण पडत आहे. ट्रामाकेअरमध्ये नव्याने ऑक्सीजनचे २० बेडबाबत चर्चा सुरु आहे. यासाठी आपण वैयक्तिक १ लाख रुपये तर किसान महाविद्यालयाकडून १ लाख असे दोन लाखाची मदत तात्काळ करणार असल्‍याचे माजी मंत्री डॉ. सतीष पाटील यांनी सांगितले.