esakal | सिरामिक पावडर टाकून तयार करायचा बनावट डांबर; पोलिसांची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

asphalt

सिरामिक पावडर टाकून तयार करायचा बनावट डांबर; पोलिसांची कारवाई

sakal_logo
By
टिम इ सकाळ

पारोळा (जळगाव) : सावखेडा मराठ (ता. पारोळा) येथे बनावट डांबराच्या कारखान्यावर जळगाव जिल्ह्याच्या सहाय्यक पोलिस अधीक्षकांनी छापा टाकला. या छाप्यात ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिता यांना गोपनीय माहिती मिळाली, की समाधान लोटन चौधरी (रा. पारोळा) नावाची व्यक्ती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून डांबर वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांशी संपर्क साधून संगनमत करीत आहे. तो आपले वाहन सावखेडा मराठ (ता. पारोळा) शिवारात हॉटेल संकेत ढाबाच्या पाठीमागे मोकळ्या जागेत नेऊन त्यातून डांबराची चोरी करून या ठिकाणी त्यात डंपरमध्ये पांढऱ्या रंगाचे सिरामिक (मार्चल) पावडर मिश्रीत करून ते गावठी भट्टीत तापवून त्यापासून बनावट डांबर तयार करून त्याची काळ्या बाजारात विक्री करून फसवणूक करीत आहे. अशी खात्रीशिर माहिती कळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिता यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, हवालदार राजेश चौधरी, रवींद्र मोतीराया, नीलेश पाटील यांनी दुपारी एकच्या सुमारास छापा टाकला असता त्याठिकाणी डांबराने भरलेले टँकर (एमएच १९, झेड ५३०२) उभे असल्याचे आढळून आले.

भट्टीतून काढताना सापडले

टँकरमधून पाइप लावून दोन जण टँकरमधून डांबर काढून ते तयार केलेल्या भट्टीत काढताना दिसले. पोलिसांचा सुगावा लागताच दोन्ही संशयित लगतच्या शेतातून पळून गेले. मात्र, मुख्य संशयित समाधान लोटन चौधरी (रा. पारोळा), टॅंकरचालक गोकुळ मोहन शिंदे (कांचननगर, जळगाव), किशोर अभिमन तायडे (धामणगाव, ता. जि. जळगाव) यांना ताब्यात घेतले. या वेळी त्या ठिकाणाहून टॅंकर, बनावट डांबर तयार करण्यासाठी लागणारी लोखंडी भट्टी, एक बारा टायर टॅंकर, बनावट केमिकल्सच्या दीडशे गोण्या आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत सुमारे ४२ लाख रुपये असून, हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तपास पोलिस करीत आहे.

loading image