ग्रामपंचायत निवडणूक..आता सोमवारच्या निकालाकडे लक्ष 

jalgaon news gram panchayat election
jalgaon news gram panchayat election

जळगाव : जिल्हयात ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत मोठ्या उत्साहात मतदारांनी मतदान केले. सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रावर गदी असली तरी दूपारी मतदानाची टक्केवारी खाली आली. दूपारनंतर मतदानाची टक्केवारी नव्वदीपार करेल असे वाटत असताना रात्री आठपर्यंत काही ठिकाणी मतदान सूरू होते. रात्री साडेअकराला जिल्ह्यात ७८.११ टक्के मतदान झाल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. आता उमेदवारांसह नागरिकांचे लक्ष सोमवारी (ता.१८) जाहीर होणाऱ्या निकालाकडे लागून आहे. 

सोमवारी मतमोजणी
जिल्ह्यात ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत्या. त्यांपैकी ९२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, ६८७ ग्रामपंचायतींत पाच हजार १४५ जागांसाठी मतदान झाले. अतिशय चूरशीच्या लढती सर्वच ठिकाणी झाल्याचे चित्र काल होते. दोन हजार ४१५ मतदान केंद्रांवर मतदान झाले. 
जळगाव तालुक्यातील मतमोजणी सोमवारी (ता.१८) सकाळी आठपासून नूतन मराठा महाविद्यालयात होणार आहे. त्यासाठीची तयारी सूरू करण्यात आली आहे. 

६८७ ग्रामपंचायतींसाठी मतदान 
जिल्हयात ६८७ ग्रामपंचायतीसाठी एकूण मतदार १३ लाख ११ हजार ८४७ होते. त्यापैकी १० लाख २४ हजार ६८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात पूरूष ५ लाख ३८ हजार ५९५ तर महिला ४ लाख ८६ हजार ५४ एवढ्या मतदारांनी मतदान केले. एकूण ७८.११ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान जामनेर तालुक्यात ८२.४५ टक्के तर सर्वात कमी मतदान भुसावळ तालुक्यात ६७.९६ टक्के झाले. 
 
तालुकानिहाय झालेले मतदान असे 
तालुका--टक्केवारी 
जळगाव--७८.४६ 
जामनेर--८२.४५ 
धरणगाव--७७.०४ 
एरंडोल--७५.८६ 
पारोळा--७८.८५ 
भुसावळ--६७.९६ 
मुक्ताईनगर--८०.८१ 
बोदवड--७८.८१ 
यावल--७७.०३ 
रावेर--८१.९७ 
अमळनेर--७७.७७ 
चोपडा--७७.४१ 
पाचोरा--७७.४८ 
भडगाव--७५.४३ 
चाळीसगाव--७९.२९ 
एकूण--७८.११ 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com