कोरोनाची ‘हिस्ट्री’ असलेल्या कर्मचाऱ्यांना निवडणुक कामातून वगळणार 

देवीदास वाणी
Sunday, 10 January 2021

निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांची सरसकट कोरोना चाचणी केली जात नसली तर ज्यांना लक्षणे आढळली त्यांना तपासणी करावी लागणार आहे.

जळगाव : जळगाव तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींपैकी ४१ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीस निवडणूक होणार आहे. यासाठी तालुका प्रशासनाने ९४० कर्मचाऱ्यांनी निवड केली आहे. त्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जे कर्मचारी कोरोनाग्रस्त होते, व १४ दिवस क्वारंटाईन होते त्यांना निवडणुकीच्या प्रकियेतून वगळण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जळगाव तालुक्यात रिंगणात ९६५ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण १७० मतदान केंद्रे असतील. एका मतदान केंद्रावर पाच कर्मचारी असतील. 
निवडणूक प्रकियेसाठी प्रशासनातर्फे तयारी अंतिम टप्प्यात आली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेतली जात आहे. यामध्ये निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांची सरसकट कोरोना चाचणी केली जात नसली तर ज्यांना लक्षणे आढळली त्यांना तपासणी करावी लागणार आहे. दरम्यान, यापूर्वी जे क्वारंटाईन होते, अशा व्यक्तींना निवडणूक प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहे. 

म्‍हणून चाचणी महत्‍त्‍वाची
कोरोनामुळे एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. जवळपास दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. अनलॉक प्रक्रियेनंतर निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असल्याने या काळात अधिकारी, कर्मचाऱ्यांची चाचणीही महत्त्वाची ठरणार आहे. 
 
असोद्यात तीन पॅनलमध्ये लढत 
असोदा (ता.जळगाव) येथील सहा वॉर्ड असून, १७ जागासांठी निवडणूक होत आहे. आतापर्यंत पॅनलपद्धतीने निवडणूक जागांसाठी निवडणूक होत आहे. तीन पॅनल व पाच अपक्ष हे पद्धतीने या ठिकाणी आतापर्यंत ५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. लोकमान्य पॅनल, असोदा विकास पॅनल, ग्रामविकास असे तीन पॅनल आहेत. तिघेही पॅनलमध्ये ग्रामविकास पॅनल निवडणुकीच्या चुरशीची लढत होण्याची शक्‍यता रिंगणात आहे. निवडणुकीची रणधुमाळी आहे. आता वाढू लागली आहे. प्रचार रॅलीने निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने गाव पिंजून काढले जात आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news gram panchayat election no work staff in corona history