
राजकीय प्रचार हा निवडणुकीचे दरम्यान करण्यात येणारा एखाद्या उमेदवाराचा अथवा राजकीय पक्षाचा प्रचार असतो. त्याचा उपयोग मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी करण्यात येतो.
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूकीचा धुराळा उडाला असून तालुक्यात एकूण ७६ ग्रामपंचायतीतून उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत, यात बहुतांश ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेत अनोखा पायंडा पाडला आहे
राजकीय प्रचार हा निवडणुकीचे दरम्यान करण्यात येणारा एखाद्या उमेदवाराचा अथवा राजकीय पक्षाचा प्रचार असतो. त्याचा उपयोग मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी करण्यात येतो. प्रजातंत्रात राजकीय प्रचार हा 'निवडणूक प्रचार' म्हणून समजला जातो. आधुनिक काळात, असा प्रचार करण्यासाठी प्रचारात, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक साधनेही वापरण्यात येत आहेत
ग्रामपंचायत निवडणुकीतही सोशल मिडीया
जळगाव जिल्ह्यता निवडणुक रंगत असून चाळीसगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असून, विविध पॅनलचे प्रमुख, इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. प्रचार म्हटले की त्यासाठी विविध प्रकारचे साहित्य लागते. यंदाच्या निवडणुकीत सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो, लहान आकाराचे व्हिडिओ आणि वेगवेगळ्या प्रकारचे संदेश मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.
टी- शर्ट, टोप्यांवर नाव
यात पक्षाचे झेंडे, खिशाला लावण्याचे बॅच, टोप्या, हातातील दोरे, पोस्टर, टी शर्ट असे साहित्य प्रचारादरम्यान वापरले जात आहे. एकीकडे उमेदवारांची प्रचाराची धावपळ सुरु असून, दुसरीकडे कार्यकर्त्यांनी प्रचारसाहित्य घेण्यासाठी गर्दी केली आहे. इच्छुक उमेदवारांनी खास आपल्या नावाचे, छायाचित्र असलेले टी शर्ट, टोप्या छापून घेतल्या आहेत यासोबतच चारचाकी असलेल्या उमेदवारांकडून अनोखा फंडा वापरला जात असल्याचे चित्र गावागावात दिसत आहे.
संपादन ः राजेश सोनवणे