निवडणुकीसाठी दोन हजार ७७४ मतदान यंत्रे 

voter machine
voter machine

जळगाव : जिल्ह्यात येत्या १५ जानेवारीस ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात एकूण दोन हजार ७७४ मतदान यंत्रे लागणार आहेत. ती यंत्रे तहसील कार्यालयांना रवाना झाली आहेत. तहसील कार्यालयात ग्रामपंचायतनिहाय उमेदवारांच्या याद्या लावून यंत्रे सील करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण दोन हजार ४१२ मतदान केंद्रे असतील. त्यावर १३ हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २० हजार २६४ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यात २८८ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते, तर १९ हजार ९७६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. माघारीच्या दिवशी सहा हजार १२९ उमेदवारांनी माघार घेतली होती. जिल्ह्यात ९३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. सध्या सात हजार २१३ जागांसाठी १३ हजार २४७ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीस आता केवळ दोन दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारांकडून प्रचारास वेग आला आहे. उमेदवार आपण आगामी काळात काय कार्य करणार आहेत याची माहिती मतदारांना देत आहेत. प्रभाग लहान असल्याने काही उमेदवारांच्या तीन वेळा प्रचारफेऱ्याही झाल्या आहेत. 

केंद्रनिहाय मतदान यंत्रे 
सर्वच तहसील कार्यालयांनी मतदान यंत्रांत ग्रामपंचायतनिहाय उमेदवारांच्या याद्या लावण्याचे कार्य सुरू आहे. तहसील कार्यालयात गाव व मतदान केंद्रनिहाय मतदान यंत्रे तयार केली जात आहेत. यात उमेदवारांच्या नावाची यादी निवडणूक चिन्हासह मतदान यंत्रावर लावण्याची कार्यवाही सुरू आहे. लवकरच मतदान कर्मचाऱ्यांना मतदानाची प्रात्यक्षिके दाखविली जाणार आहेत. 
 
तालुकानिहाय पाठविलेली मतदान यंत्रे 
तालुका--एकूण मतदान केंद्रे--आवश्यक सी.यू.--आवश्यक बी.यू. 
जळगाव--१७०--१९६--१९६ 
जामनेर--२३३--२६८--२६८ 
धरणगाव-१२२--१४०--१४० 

भडगाव--९९--११४--११४ 
रावेर--१६५--१९०--१९० 
यावल--१७९--२०६--२०६ 
बोदवड--८०--९२--९२ 

अमळनेर--१५४--१७७--१७७ 
पाचोरा--२९५--३३९--३३९ 
भुसावळ--११८--१३६--१३६ 
एरंडोल--११८--१३६--१३६ 

पारोळा--१३०--१५०--१५० 
चाळीसगाव--२३७--२७३--२७३ 
मुक्ताईनगर--१५१--१७४--१७४ 
चोपडा--१६१--१८५--१८५ 
एकूण--२४१२---२७७४--२७७४ 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com