चोपड्यात साडेचार लाखांचा गुटखा जप्त

चोपड्यात साडेचार लाखांचा गुटखा जप्त
tobacco
tobaccotobacco

चोपडा (जळगाव) : शहरात गस्तीवरील पोलिसांनी (Jalgaon police) गुप्त माहितीच्या आधारे पाटीलगढी भागात छापा टाकून रमाकांत बाबुराव मराठे याच्याकडून ९१ हजार ५२० रुपये किमतीचा विमल पान मसाला व सुंगधित तंबाखू जप्त (Tobacco) करण्यात केला. त्याने दिलेल्या माहितीवरून मुख्य संशयित राहुल विश्वास गुजराथी (रा. गुजराथी गल्ली, चोपडा) यास ताब्यात घेऊन ३ लाख ५८ हजार ६७० रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण साडेचार लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. (Tobacco worth Rs 4.5 lakh seized in chopda)

२१ प्रकारच्‍या पानमसाला

अटकेदरम्यान संशयित राहुल गुजराथी याने दिलेल्या माहितीच्या आधारे मच्छी मार्केटमध्ये उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकअप चारचाकी वाहन (एमएच १९, बीएम ५३८७) ताब्यात घेण्यात आले. त्यात २१ प्रकारच्या पानमसाला व सुगंधित तंबाखू असा ३ लाख ५८ हजार १५० किमतीचा माल व पिकअप वाहन व चालक श्याम बडगुजरसह आढळून आले. संशयित व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. संशयित श्याम बडगुजर यास विचारपूस केली असता त्याने हा माल

tobacco
पडद्यामागील ‘कोरोनायोद्धे’ : अखंडित विजेसाठी राबताहेत हजारो हात

राहुल गुजराथी याचा असल्याबाबत सांगितले. या गुन्ह्यात एकूण ४ लाख ४९ हजार ६७० किमतीचा गुटखा व पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनासह ३ संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, पोलिस कर्मचारी अंबादास सैंदाणे, विलेश सोनवणे, संतोष पारधी, प्रदीप राजपूत, ज्ञानेश्वर जवागे, शेषराव तोरे, वेलचंद पवार, रत्नमाला शिरसाठ, संदीप भोई, रवींद्र पाटील यांच्या पथकाने कारवाई केली आहे. पोलिस कर्मचारी शेषराव तोरे तपास करीत आहेत.

अन्न व औषध प्रशासनाची डोळेझाक

यापूर्वी शहरात लहान मोठ्या गुटख्याच्या कारवाई होत असला तरी अनेक दिवसांनंतर मुख्य संशयित पोलिसांच्या हाती लागल्याचे शहरात बोलले जात आहे. यात अन्न व औषध प्रशासनाने मात्र डोळेझाक केली असली तरी शहरात सातपुडापर्वत रांगांमधून सर्रास लाखोंचा गुटखा मध्यप्रदेश मार्गे चोपड्यात येत असल्याने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com