पतीच्या छातीवर पिस्‍तुल रोखत पत्‍नीच्या अंगावरील दागिने ओरबाडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

व्याजाच्या पैशांची मागणी करीत राजू सूर्यवंशी यांनी यांच्याकडील एक पिस्तूल फिर्यादी संजय खन्ना यांच्या छातीला लावले व त्यांचा भाऊ अनंत सूर्यवंशी यानेही खन्ना यांना ठार मारण्याची धमकी दिली.

पतीच्या छातीवर पिस्‍तुल रोखत पत्‍नीच्या अंगावरील दागिने ओरबाडले

वरणगाव (जळगाव) : भुसावळ शहरातील राजकीय पदाधिकारी राजू सूर्यवंशी यांच्याकडून दर्यापूर शिवार, साईनगर वरणगाव फॅक्टरी परिसरातील रहिवासी संजय खन्ना यांनी दुर्धर आजारी असल्याने दवाखानाच्या उपचारासाठी व्याजाने पैसे घेतले होते. त्यातील काही उर्वरित रकमेच्या व्यवहारापोटी आरोपीने फिर्यादीच्या छातीला पिस्तूल लावून त्यांच्या पत्नीच्या अंगावरील सोन्याचे दागिने ओरबाडून नेल्याप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात राजू सूर्यवंशी व अंनत सूर्यवंशी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय खन्ना (वय ५६, रा. साईनगर, दर्यापूर शिवार वरणगाव फॅक्टरी) व त्यांची पत्नी दोघेही घरी असताना संशयित आरोपी राजू सूर्यवंशी व अनंत सूर्यवंशी व सोबत दोन बंदूकधारी अंगरक्षक १५ ऑगस्ट २०२० ला फिर्यादीच्या घरी आले. व्याजाच्या पैशांची मागणी करीत राजू सूर्यवंशी यांनी यांच्याकडील एक पिस्तूल फिर्यादी संजय खन्ना यांच्या छातीला लावले व त्यांचा भाऊ अनंत सूर्यवंशी यानेही खन्ना यांना ठार मारण्याची धमकी दिली. वरणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी फिर्यादी संजय खन्ना यांच्या जिवास धोका असल्याने दोन पोलिस कर्मचारी संजय खन्ना यांच्या संरक्षणासाठी निवासस्थानी तैनात केले आहे. 

पत्नीचे दागिने ओरबाडले 
संशयितांनी फिर्यादीच्या पत्नीच्या अंगावरील ३५ हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ९५ हजार रुपये किमतीचे २५ ग्रॅम वजनाच्या दोन बांगड्या, १७ हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाची सोन्याची एक अंगठी, १३ हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स असे एकूण एक लाख ६० हजर रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ओरबाडून नेले.

संपादन ः राजेश सोनवणे

Web Title: Marathi Jalgaon News Holding Gun Ornaments His Wifes Body Were Smashed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonDaryapur