
परिचारिका दिन विशेष : आबालवृद्धांसाठी नर्सच बनल्या पालक
जळगाव : कोरोना संसर्गाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेत भीषण स्थिती असताना ज्येष्ठ नागरिकच नव्हे, तर आता लहान मुलेही बाधित होण्याचे प्रमाण वाढलेय. अशावेळी कुटुंबातून वेगळे राहणाऱ्या आबालवृद्धांचे पालकत्व स्वीकारून समर्पितपणे सेवा करताय. (coronavirus second stage parents became nurses for young and old)
मार्च २०२० पासून जगावर कोरोनाचे संकट आलेय. भारतही या वैश्विक महामारीविरोधात संघर्ष करतोय. पहिली लाट ओसरत असतानाच फेब्रुवारीपासून कोरोना संसर्गाची दुसरी आणि तीदेखील तीव्र लाट आली. या लाटेत ज्येष्ठ नागरिकांनाच नाही, तर तरुणांवरही कोरोनाचा विळखा अधिक घट्ट झालाय. काही ठिकाणी लहान मुलेसुद्धा कोरोनाने बाधित होऊन गंभीर झाल्याचे प्रकार समोर आलेत.
नर्स नव्हे पालकच
आपल्यांना आपल्यापासून दूर करणारा आणि अगदी सेवेची संधीही न देणारा भयंकर रोग म्हणून कोरोनाचा अनुभव वर्षभरापासून आपल्या पाठीशी आहे. अशा स्थितीत रुग्णाचे कुटुंबीय, नातलग त्याच्याजवळ नसतात. परंतु त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर व सेवा करणाऱ्या नर्स २४ तास रुग्णसोबत असतात. ज्येष्ठ नागरिक व मुलांवरील उपचाराबाबत तर या नर्सच पालकत्वाच्या भूमिकेतून त्यांची सेवा करताना दिसताय.
हेही वाचा: जागतिक परिचारिका दिन : ..अन् त्यांच्या शुश्रूषेमुळे फुलते चेहऱ्यावर हास्य
त्या दिवशी कोविड कक्षात सेवेत असताना ११ वर्षीय मुलीला घेऊन तिची आई व मामा आले. कोविड रिपोर्ट निगेटिव्ह पण सीटी स्कॅनचा स्कोअर १८. अकरावर्षीय मुलवर कसा उपचार करणार? पण, बालरोगतज्ज्ञांशी बोलून औषधाचे प्रमाण निश्चित करून ऑक्सिजन लावला. दुसऱ्या दिवशी तिची प्रकृती थोडी सुधारली. जाईल तर बरी होऊनच, असा निर्धार तिने केला. ११ दिवसांत तिच्याशी मैत्री झाली. कोविडच्या भीषण अनुभवातून ती बाहेर आली, सावरली... आनंदली...
- सुकन्या वानखेडे (एम. एस्सी.,नर्सिंग)
वर्षभरात अनेक गंभीर, अतिगंभीर रुग्ण दाखल झाले. बरेचसे मोठ्या हिमतीने संघर्ष करून बरे झाले, तर काहींच्या आयुष्याची दोरी तुटली. तो प्रत्येक प्रसंग अत्यंत विदारक. स्वत:सह कुटुंबाची काळजी घेऊन रुग्णसेवा करणे किती कठीण, हे या काळात कळले. आजपर्यंतच्या सेवाकाळात अशाप्रकारच्या महामारीत जिथे सख्खे नातलग जवळ यायला तयार नसतात अशा स्थितीत रुग्णसेवा करण्याची संधी मिळणेही मोठे. ईश्वराचे आदेशच म्हणा, म्हणून सक्षमपणे सेवा करतेय.
-रूपाली पाटील (परिचारिका, जीएमसी)
Web Title: Marathi Jalgaon News International Nurses Day Parents Became Nurses For Young And
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..