कावपिंप्रीचे भूमिपुत्र पाटील राष्ट्रपतिपदकाचे मानकरी 

police pravinkumar patil
police pravinkumar patil

अमळनेर (जळगाव) : कावपिंप्री (ता. अमळनेर) येथील रहिवासी तथा सध्या नवी मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले प्रवीणकुमार पाटील यांच्यासह राज्यातील २१ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतिपदक जाहीर करण्यात आले आहे. 
श्री. पाटील यांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी पदक मिळाले आहे. २६/११ च्या हल्ल्यात कसाबला ऑर्थर रोड जेलमधून येरवडा जेलमध्ये नेण्यासाठी अमलात आणलेल्या ‘ऑपरेशन एक्स’मध्ये श्री. पाटील यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. तसेच पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाळू आणि जमीनमाफियांना आळा घालण्यासाठी त्यांनी अत्यंत प्रखरपणे उपाययोजना आखल्या होत्या. 

पाटील यांचे कार्य
नानविज दौंड येथे पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून काम करत असताना त्यांनी दुर्लक्षित असलेले पोलिस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आणून या प्रशिक्षण केंद्राचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला. त्या काळात त्यांनी सुमारे पंधराशे प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले. लातूर उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर असताना त्यांनी अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यांना प्रतिबंध घातला आणि त्यांचा उपविभाग जिल्ह्यात एक नंबर ठेवला. अशा अनेक महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्यामुळे कावपिंप्रीत आनंदाचे वातावण असून, गावासह परिसरातून श्री. पाटील यांचे कौतुक होत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com