पुरस्कारातून ऊर्जा घेऊन आता सर्वोत्कृष्ट कामे : जिल्हाधिकारी राऊत

पुरस्कारातून ऊर्जा घेऊन आता सर्वोत्कृष्ट कामे : जिल्हाधिकारी राऊत
jalgaon collector abhijit raut
jalgaon collector abhijit rautsakal
Updated on

जळगाव : ‘माझी वसुंधरा’ अभियानात (Majhi vasundhara abhiyan) जे पुरस्कार मिळाले ते पुरस्कार सर्व नागरिक लोकप्रतिनिधी, तळागाळातील काम करणारे अधिकारी कर्मचारी यांचा खऱ्या अर्थाने गौरव असतो. सचिवापासून विभागीय आयुक्त, जिल्हास्तरावर अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी पदाधिकारी आणि त्यांना लोकप्रतिनिधींनी जी साथ दिली. त्यातून सर्वोत्कृष्ट कामे त्यात ठिकाणी होऊन जिल्ह्यातील ग्रामपंचायती, नगरपरिषद, पालिकांना हा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट ‘जिल्हाधिकारी’ म्हणून मिळालेल्या पुरस्कारातून ऊर्जा घेऊन भविष्यात जिल्ह्यात काही चांगली कामे नक्की करू, असा विश्‍वास (Jalgaon collector abhijit raut) जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केला. (majhi-vasundhara-abhiyan-first-rank-in-state-jalgaon-collector-abhijit-raut)

jalgaon collector abhijit raut
पुनर्रचनेच्या नावाने शिवसेनेत शह-काटशहाचे राजकारण

पंचतत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियान २०२०-२१ अंतर्गत जळगाव जिल्ह्याने राज्यात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी राऊत यांचा सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन सन्मान नूकताच झाला. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

jalgaon collector abhijit raut
कोरोना निर्बंधांमुळे विवाह नोंदणीतही घट

आता तसे परिणाम द्यावे लागतील

जिल्‍हाधिकारी म्हणाले, की ‘माझी वसुंधरा’ अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पालिकांनी राज्यात सर्वोत्तम कामगिरी केली होती. यामुळे एकत्रीत गुण राज्यात सर्वाधिक झाले. यामुळे सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून पुरस्कार मिळाला. या पुरस्काराने माझी जिल्ह्यातील जबाबदारी अधिक वाढली आहे. पर्यावरण व स्वच्छतेच्या क्षेत्रात अधिक काम करून पर्यावरण रक्षण कसे होईल, स्वच्छता राहिली की नागरिकांचे आरोग्य सुदृढ कसे राहील यासाठी प्रयत्नशिल राहू. यापूर्वीही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना केंद्राचा स्वच्छता दर्पण पुरस्कार, राज्याचा यशवंत पंचायत राज पुरस्कार, स्वच्छता विभागाचा असे तीन पुरस्कार मिळाले आहेत. हे पुरस्कार कौतुकाची थाप म्हणून आवश्‍यक असतात. त्यातून जबाबदारी वाढली आहे. तसे परिणाम द्यावे लागतील. जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनातही चांगले काम झाले आहे. त्यातही गुणगौरव होईल.

अभियान सुरूच राहणार

अभियानात जिल्ह्यात बारा ग्रामपंचायती, महापालिका, पालिकांनी सहभाग घेतला होता. विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन त्यात सर्वांनीच या अभियानात चांगले काम करावे. त्यांनी अभियानाची रूपरेषा सांगितली. त्यानुसार पालिका, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची बैठका घेऊन अधिकारी नेमले. या अभियानाचा उद्देश सर्वांना समजावून सांगितले. त्याअनूषंगाने अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी संबंधित बाबींचा तपासण्या केल्या. पर्यावरण व आरोग्याबाबत जनजागृती हे या अभियानाचे उद्दिष्ट होते. पर्यावरण जनजागृती व पर्यावरण रक्षण हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. पर्यावरणाचे संतुलन राहिले तर आरोग्य चांगले राहते. यापुढेही जिल्ह्यात हे अभियान सुरू राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon electricity supply controversy involving farmers
Smart Meter Bill
Girish Mahajan political retirement news
Fatal Car Accident on Washim Malegaon Road Parked Truck Collision Claims Life of Young Man From Shirpur Jain
Marathi News Esakal
www.esakal.com