पोटच्या मुलांनीच सोडली साथ; कोरोनातून बरी झाल्‍यानंतर घरी नेण्यास नकार

पोटच्या मुलांनीच सोडली साथ; कोरोनातून बरी झाल्‍यानंतर घरी नेण्यास नकार
mother corona recover
mother corona recoversakal

रावेर (जळगाव) : एकीकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून कोरोना रुग्णांची (Coronavirus) सेवा करण्यासाठी अनेक समाज घटक पुढे येतात. दुसरीकडे कोरोनातून बऱ्या झालेल्या आईला दवाखान्यातून घरी (Covid center) नेण्यास तालुक्यातील चिनावल येथील चौघा भावांनी नकार दिल्याची खळबळजनक बाब बुधवारी (ता. १९) सायंकाळी उशिरा उघडकीस आली. मात्र त्याच वेळी दुसरीकडे चिनावल येथील सरपंचांचे पती आणि सामाजिक कार्यकर्ते योगेश बोरोले यांनी पुढाकार घेत या वयोवृद्ध स्त्रीची निवास, भोजन व्यवस्था चिनावल येथील अंगणवाडीच्या खोलीत केली आणि वृद्धेच्या मुलांची कानउघाडणी करून त्यांनाही पुन्हा आईच्या सेवेत रुजू केल्याने दुसरीकडे माणुसकी जीवंत असल्याची बाबही दिसून आली. (mother recover coronavirus but child not come to hospital)

mother corona recover
जि.प. सदस्य धडकले..आणि पोषण आहार विल्हेवाटीचा डाव फसला !

चार मुले अन्‌ एक मुलगी

चिनावल येथील सुमनबाई प्रभाकर मालखेडे (वय ७५) ही वयोवृद्ध महिला अक्षय तृतीयेपासून ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सीजन बेडवर कोरोनाचे उपचार घेत होत्या. त्यांना चार मुले आणि एक विवाहित मुलगी आहे. सर्वजण चिनावल येथील चौधरी वाड्यात राहतात. विटा थापण्याचा व्यवसाय करतात. सुमनबाई यांची मुले येथील ग्रामीण रुग्णालयात यायची पण बाहेरूनच चौकशी करून निघून जात.

त्‍यांचा आईला नेण्यास नकार

सुमनबाई यांची तब्येत सुधारल्याने डॉक्टरांनी त्यांना सुट्टी देत घरी जाण्यास सांगितले. मात्र आपले घर लहान आहे, घरामध्ये कुटुंबातल्या सदस्यांची संख्या जास्त आहे. आईमुळे कुटुंबातील अन्य सदस्यांना संसर्ग होऊ शकतो; असे म्हणत आईला घरी नेण्यास चौघा मुलांनी नकार दिला. दोन दिवसांपासून सुटी होऊनही या वृद्ध सुमनबाई ग्रामीण रुग्णालयातच घरी जाण्याच्या प्रतीक्षेत होत्या.

mother corona recover
दिलासा..बाधितांची संख्या घटून साडेतिनशेच्या घरात

तिला घरी जाण्याची आस पण

मुले त्यांना न्यायला तयार नाहीत हे ही त्यांना माहिती नव्हते. ग्रामीण रुग्णालयातून दूरध्वनीद्वारे एका सामाजिक कार्यकर्त्याने ही बाब येथील ‘सकाळ’चे बातमीदार दिलीप वैद्य यांना सांगितली. वैद्य यांनी चिनावल येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश बोरोले यांच्या कानावर ही बाब टाकत मुलांचे मन वळविण्यासाठी श्री. बोरोले यांना विनंती केली. मात्र ही घटना ऐकताच बोरोले यांनी महिलेस घेण्यासाठी गाडी पाठवतो किंवा शक्य असल्यास तुम्ही महिलेला चिनावल येथे पोहचवा, मी मुलाप्रमाणेच तिची काळजी घेईन असे सांगितले. त्यांनी तातडीने ग्रामपंचायतीच्या अंगणवाडी खोलीत या महिलेची व्यवस्था केली.

स्‍वागताची तयारी

ग्रामपंचायतीच्या हितेंद्र फेगडे, प्रकाश भंगाळे, राहूल नेमाडे, बबलू तडवी, नोमदास कोळंबे या कर्मचाऱ्यांना बोलावून खोली स्वच्छ करून तिथे लाईट आणि पंख्याची सोय केली. सुमनबाईच्या स्वागताची तयारी करण्यात आली. येथील अंबिका व्यायाम शाळेच्या ॲम्बुलन्समधून या महिलेस चिनावल येथे पोहोचविण्याचे निर्देश भास्कर महाजन यांनी चालक विनायक महाजन यांना दिले. प्रकाश पाटील आणि ऍम्ब्युलन्स चालक वासुदेव महाजन यांनी आवश्यक ती मदत केली. सायंकाळी उशिरा या महिलेला चिनावल येथे पोहोचवण्यात आले. महिला अंगणवाडीच्या खोलीत पोहोचल्यानंतर तिची मुलेही तिथे पोहचली. बोरोले यांनी मुलांची चांगलीच कान उघाडणी केली. यावेळी उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले.

गावांत यापुढेही कोणालाही अशी जागेची किंवा भोजनाची अडचण आल्यास त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करू.

- योगेश बोरोले, सामाजिक कार्यकर्ते, चिनावल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com