‘डेल्टा प्लस’चा थेट फुफ्फुसांवर परिणाम

‘डेल्टा प्लस’चा थेट फुफ्फुसांवर परिणाम
Delta plus
Delta plusDelta plus

जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या नवीन रूपाने, डेल्टा प्लस व्हेरियंटने चिंता वाढविली आहे. डेल्टा प्लस हा व्हेरियंट अधिक संसर्गजन्य आहे. हा विषाणू फुफ्फुसांच्या पेशींच्या रिसेप्टरला अधिक घट्टपणे चिपकून राहण्यास सक्षम आहे. ज्यामुळे फुफ्फुसांना लवकर प्रभाव होण्याची शक्यता आहे. हा व्हेरियंट आपल्या प्रतिकारशक्तीस चकवा देण्यासही अधिक सक्षम आहे, अशी माहिती वैद्यकीयतज्ज्ञांनी ‘सकाळ’ला दिली आहे. (jalgaon-news-new-delta-plus-verient-patient-attack-lungs)

Delta plus
वरखेड्यात बिबट्याचे हल्ले सुरुच..शेतातून बकरी पळवली

डेल्टा प्लस व्हेरियंटचा संसर्ग झालेल्यांना तीव्र खोकला, सर्दी होत आहे. पण सर्दीची लक्षणे मागील विषाणूपेक्षा अगदी वेगळी असल्याचे आढळली आहेत. विविध अभ्यासानुसार डोकेदुखी, घसा खवखवणे आणि सतत नाक वाहणे ही डेल्टा प्लस व्हेरियंटची सर्वसामान्य लक्षणे आहेत. या व्हेरियंटमुळे देशातील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वेगाने वाढू शकते, असा अनुमान वर्तविला जात आहे.

‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ म्हणजे काय?

कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट ज्याला बी.६१७.२ असे म्हटले जाते. या व्हेरियंटचा म्यूटेंट होऊन त्याचे डेल्टा प्लस किंवा एवाय.१ मध्ये रूपांतरण झाले. डेल्टा व्हेरियंटच्या स्पाइकमध्ये के४१७एन म्यूटेशन जोडल्याने डेल्टा प्लस व्हेरियंट तयार झाला आहे. के४१७एन व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या बीटा व्हेरियंट आणि ब्राझीलमध्ये सापडलेल्या गॅमा व्हेरियंटमध्येही आढळला आहे. डब्लू.एच.ओ.ने डेल्टा व्हेरियंटला ‘चिंताजनक व्हायरस’ असे संबोधले आहे.

Delta plus
महात्मा फुले महामंडळ अपहारप्रकरणी भुसावळात कारवाई

महाराष्ट्रातील रत्नागिरीत ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटचे नऊ रुग्ण

जळगावात सात रुग्ण, मुंबईत दोन रुग्ण, पालघर, ठाणे, सिंधुदुर्गमध्ये ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. जळगावातील सर्व सातही रुग्णांची स्थिती स्थिर आहे.

..अशी घ्या काळजी

‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटपासून बचाव करण्यासाठी नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सांगितले, की सर्वांनीच विनाकारण घराबाहेर पडू नये. घराबाहेर पडण्यापूर्वी दोन मास्क लावावे. दिवसातून वेळोवेळी हात धुवा, इतरांपासून सहा फूट शारीरिक अंतर ठेवा, हस्तांदोलन करू नका, कोविड विरुद्धची लस घ्या, प्रोटिनयुक्त सकस आहार घेत फळांचे सेवन करा, संशयास्पद लक्षणे असल्यास आपल्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार सुरू करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com