वायरमनचा मारहाणीत मृत्‍यू; कारवाईबाबत नितीन राऊत यांचे व्‍टीट

वायरमनचा मारहाणीत मृत्‍यू; कारवाईबाबत नितीन राऊत यांचे व्‍टीट
NItin raut tweet
NItin raut tweetsakal

जळगाव : भडगाव– पाचोरा येथे सत्‍ताधारी शिवसेनेच्‍या आमदारांनी (Shiv sena mla kishor patil) महावितरण कार्यालयास टाळे ठोक आंदोलन झाले. मात्र सात जणांनी भडगाव येथील महावितरण कार्यालयात असलेल्या उपकार्यकारी अभियंता यांच्या कॅबीनची तोडफोड करत मारहाण केल्याची घटना घडली. यात कर्तव्‍यावर असलेले वायरमन गजानन राणे यांचा मृत्‍यू झाला. याबाबत ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Maharashtra Energy Minister Nitin Raut) यांनी व्‍टीट करून कारवाईचे आश्‍वासन दिले आहे. (nitin-raut-tweet-mahavitaran-wireman-death-in-bhadgaon)

शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी महावितरणच्या कृषी पंपाच्या वीजबीलाची सक्‍तीने वसुली या विरोधात भडगाव व पाचोरा तालुक्यातील महावतरण कार्यालयात टाळे ठोक आंदोलन केले. त्या अनुशंगाने भडगाव येथील चाळीसगाव रस्त्यावरील महावितरणच्या कार्यालयात सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान पोलिस बंदोबस्तात शिवसेनेतर्फे आंदोलन केले. मात्र हे आंदोलन झाल्‍यानंतर चाळीसगाव रस्त्यावरील महावितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांच्या दालनात मोटारसायकलवर आलेल्‍या सात जणांनी प्रवेश करत त्यांना मारहाण केली. तर कॅबीनची ही तोडफोड केली.

NItin raut tweet
‘अनलॉक’ झाले पण काळजी घ्यावीच लागेल

मध्‍यस्‍थी करण्यासाठी गेले राणे

दरम्यान येथे उपस्थित असलेले वरीष्ठ तंत्रज्ञ गजानन राणे हे उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांना सोडविण्याच्या प्रयत्न करण्यासाठी गेले. यावेळी त्यांना ही या सात अज्ञांत हल्लेखोरांनी धक्काबुक्की केली. धकधक्काबुक्कीत ते खाली पडले. त्यात त्यांचा (Mahavitaran wireman gajanan rane death) मृत्यू झाला. त्यामुळे सात इसम राणे यांच्या मृत्‍यूस कारणीभुत ठरल्याचे, याशिवाय उपकार्यकारी अभियंता अजय धामारे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे श्री. धामोरे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

ऊर्जा मंत्रींचे व्‍टीट

महावितरणचे तंत्रज्ञ गजानन राणे यांचा मारहाणीत मृत्‍यू झाला. याबाबत राज्‍याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी व्‍टीट करत घटनेबाबत दुःख व्‍यक्‍त केले. तसेच या घटनेतील दोषींवर कारवाई करण्यास प्रयत्‍नशील असल्‍याचे त्‍यांनी व्‍टीटमध्‍ये म्‍हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com