विद्यापीठाचे दातृत्व..अंत्यविधीसाठी दिली दोनशे टन लाकूड

विद्यापीठाचे दातृत्व..अंत्यविधीसाठी दिली दोनशे टन लाकूड
north maharashtra university
north maharashtra universitynorth maharashtra university
Updated on

जळगाव : कोरोनामुळे मृत्यूसंख्या (Corona death) वाढत असताना स्मशानभूमीत गरजू व निराधारांना अत्यंविधीसाठी लाकडे कमी पडू नये, यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने (North maharashtra university) परिसरातील अनगड व जळाऊ लाकडे जळगाव मनपास सुपूर्द केली आहेत. (north maharashtra university wood corporation)

कोरोनाच्या या उद्‌भवलेल्या स्थितीत स्मशानभूमीत लाकडे कमी पडू नयेत, यासाठी प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या पुढाकाराने विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने विद्यापीठ परिसरातील जळाऊ लाकडे देण्याचा निर्णय घेतला.

north maharashtra university
लाखोचा माल करायचे खरेदी; बदल्‍यात रकमेचा द्यायचे चेक, पण त्‍यांची चालाखी उघड

दोनशे टन लाकूड

विद्यापीठाच्या ६५० एकरच्या परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यातील कोसळलेली किंवा वाळलेली झाडे एकत्रित करून ठेवली होती. त्यामध्ये निम, गुलमोहर, सुबाभूळ, निलगिरी, तसेच काही काटेरी वृक्षांचा समावेश आहे. मनपाशी विद्यापीठाने पत्रव्यवहार केला व स्मशानभूमीच्या दैनंदिन कामासाठी ही सुमारे दोनशे टन लाकडे मोफत देण्याची तयारी दर्शविली. शनिवारी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, माजी महापौर तथा सिनेट सदस्य व नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी विद्यापीठास भेट दिली व विद्यापीठ प्रशासनाला आभाराचे पत्र दिले.

विद्यापीठ परिसरात गेल्या दोन वर्षांपासून वाळलेली व कोसळून पडलेल्या झाडांची लाकडे एकत्र करून ठेवण्यात आली होती. कोरोनाच्या काळात मृतांची संख्या वाढली असून, स्मशानभूमीत लाकडे कमी पडू नयेत, यासाठी विद्यापीठाने मनपास ही सर्व लाकडे देण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठ संकटाच्या काळात समाजाच्या मदतीला नेहमीच घाऊन जात असते. तोच पायंडा यावेळी देखील कायम ठेवण्यात आला.

-प्रा. ई. वायुनंदन, प्रभारी कुलगुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com