esakal | गायींच्या संगोपनासाठी चक्‍क मागितली खावटी
sakal

बोलून बातमी शोधा

care in cow

गायींचे संगोपन, रक्षण व देखभाल केली जाते. ११ डिसेंबर २०२० ला पाचोरा पोलिसांनी कत्तलीसाठी ट्रकमधून नेण्यात येत असलेल्या चार गाई व एक गोऱ्हा पकडून ट्रक जप्त केला.

गायींच्या संगोपनासाठी चक्‍क मागितली खावटी

sakal_logo
By
सी. एन. चौधरी

पाचोरा (जळगाव) : आपल्या मालकीच्या गोशाळेत कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गायी पोलिसांनी सोडल्यानंतर त्यांच्या संगोपनासाठी खावटीची मागणी करणारी याचिका अॅड. चंद्रकांत शर्मा यांनी पाचोरा न्यायालयात दाखल केली आहे. गायींसंदर्भात खावटीची अशा प्रकारची याचिका प्रथमच अॅड. शर्मा यांनी दाखल केली आहे. 
आर्वे (ता. पाचोरा) शिवारात गोपाळकृष्ण शर्मा गोशाळा असून, येथे गायींचे संगोपन, रक्षण व देखभाल केली जाते. ११ डिसेंबर २०२० ला पाचोरा पोलिसांनी कत्तलीसाठी ट्रकमधून नेण्यात येत असलेल्या चार गाई व एक गोऱ्हा पकडून ट्रक जप्त केला. ट्रकचालक शेख इसाक व क्लीनर जावेद कुरेशी (दोघे रा. शेंदुर्णी, ता. जामनेर) यांना अटक केली. बजरंग दलाचे सचिन वाणी, गजानन जोशी, अतुल गुरव यांच्यासोबत पोलिसांनी गोपाळकृष्ण शर्मा गोशाळेत या गायी व गोऱ्हा आणून सोडला. 

हक्‍क सांगणारे कोणी आलेच नाही
गायींची अवस्था मरणासन्न अशी होती. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करून या गायींची प्रकृती ठणठणीत करण्यात आली. या गायींचा मालकीहक्क सांगण्यासाठी व गायी परत नेण्यासाठी ॲड. शर्मा यांनी मालकाची वाट पाहिली. परंतु कोणीही हक्क सांगितला नाही. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र ॲनिमल प्रिव्हेंशन अॅक्टच्या आधारे ट्रकचालक इसाक शेख, क्लिनर जावेद कुरेशी यांना पार्टी करून पाचोरा न्यायालयात याचिका दाखल करून या गायींच्या कस्टडीचा आदेश व्हावा, गायींच्या संगोपनासाठी प्रति दिवस ३०० रुपये खावटी गो शाळेला मिळावी, या गायी गो शाळेला दान देण्याचे आदेश व्हावेत, खावटी दिली नाही तर गायींचा लिलाव करून येणारी रक्कम गोशाळेकडे खावटी म्हणून जमा करावी, त्यातून पुरेशी रक्कम न मिळाल्यास शेख व कुरेशी यांची मिळकत जप्त करून खावटी साठीची रक्कम गोशाळेस देण्याचे आदेश व्हावेत अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. अशा प्रकारची याचिका दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असून, गोशाळा मालकांनी महाराष्ट्र ॲनिमल प्रिव्हेंशन अॅक्टचा आधार घेऊन आपल्या गोशाळेत आणून सोडलेल्या गायींच्या संगोपनासाठी आर्थिक मोबदला घेण्याचा हक्क दाखवावा व त्याआधारे योग्य प्रकारे गायींचे संगोपन व देखभाल करावी, असे आवाहन ॲड. चंद्रकांत शर्मा यांनी केले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image