ऑक्सिजनअभावी दोघांचा मृत्यू; पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

ऑक्सिजनअभावी दोघांचा मृत्यू; पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील प्रकार
corona death
corona deathcorona death

पाचोरा (जळगाव) : शहरासह परिसरात कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढत असून, रुग्णसंख्येसह मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण अत्यंत भीतीदायक ठरत आहे. ग्रामीण भागातही कुटुंबच्या कुटुंब बाधीत होत असल्याने सरकारी व खासगी रुग्णालये हाऊसफुल झाली आहेत. तसेच जळगाव, धुळे, नाशिक, चाळीसगाव, औरंगाबाद, पुणे, मुंबई येथे स्थलांतरित होऊन उपचार घेणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे.

पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शनिवारी ३० रुग्ण उपचार घेत असताना ऑक्सिजन संपल्याने प्रचंड खळबळ उडाली. त्यात महेश राठोड (वय २२, रा. कुऱ्हाड बुद्रुक, ता. पाचोरा) व ग्यारसीबाई चव्हाण (वय ७६, रा. हनुमंतखेडा, ता. सोयगाव) या दोघांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. उर्वरित रुग्ण व त्यांचे नातलग या प्रकारामुळे प्रचंड भयभीत झाले.

अमोल शिंदे बनले देवदूत

ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपल्याने उपचारार्थ दाखल असलेल्या रूग्णांचे जीव धोक्यात आल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांना कळताच त्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला व त्वरित ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णांना करता यावा म्हणून शहरातील खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांना अक्षरशः हात जोडून विनंती करून त्यांच्याकडून उसनवारीच्या बोलीवर ऑक्सिजन सिलिंडर मिळवले. यात हिंदुस्तान गॅसचे अबुलीस शेख यांचे विशेष सहकार्य लाभले. आनंद हॉस्पिटलचे डॉ. आनंद मौर्य, विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ. भूषण मगर व सागर गरुड, संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. पवनसिंग पाटील यांनी शिंदे यांच्या विनंतीला मान देत आपल्याकडील ऑक्सिजन सिलिंडर उसनवारीच्या बोलीवर त्यांना दिल्याने ग्रामीण रुग्णालयातील इतर रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणे शक्य झाले व रुग्णांचे प्राणही वाचले. श्री. शिंदे यांच्या या तत्परतेचे व नियोजनाचे कौतुक होत आहे. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनीही जिल्हा प्रशासनाकडे याबाबत माहिती देऊन १६ ऑक्सिजन सिलिंडर मिळण्याबाबतचे नियोजन केले.

ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत झालेल्या दोघांची स्थिती प्रथमपासूनच बिकट होती. त्यात ऑक्सिजनचा प्रश्र बिकट झाला. ऑक्सिजन सिलिंडर दररोज मागवले जातात. शनिवारी (ता. १) गाडी उशिरा आल्याने असा प्रसंग ओढवला. आता ऑक्सिजनचे १८ सिलिंडर प्राप्त झाले असून, दररोज दोन वेळा जळगाव येथे गाडी पाठवून सिलिंडर मागवले जातात. सर्व रुग्णांची परिस्थिती आता ठीक आहे.

- डॉ. अमित साळुंखे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, पाचोरा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com