esakal | कारवाई करुनही गुरांच्‍या बाजारात सोशल डिस्टसिंगचा फज्जा!

बोलून बातमी शोधा

corona}

प्रशासनाने रात्रीचा लॉकडाउन जाहीर करत १५ मार्चपर्यंत मुदत देखील वाढविली आहे. शिवाय, बाजार भरण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. असे असताना देखील नियमांची पायमल्‍ली होत असल्‍याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

कारवाई करुनही गुरांच्‍या बाजारात सोशल डिस्टसिंगचा फज्जा!
sakal_logo
By
संजय पाटील

पारोळा (जळगाव) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये सर्वत्र आठवडे बाजारासह गुरांचा बाजाराला बंदी करण्यात आली आहे. तरी देखील बाहेरगावच्या व्यापाऱ्यांसह शहरातील व्यापारी यांनी अमळनेर रोडलगत व्यंकटेशनगर परिसरात गुरांचा बाजार भरविला. यात सर्वत्र फिजीकल डिस्टसिंगचा फज्जा उडविला. पालिका व पोलिस प्रशासनाने कारवाई करुन देखील अनेक व्यापाऱ्यांनी अनेक ठिकाणी बाजार सुरु असल्याचे सांगत आपलीच मनमानी केली.

फेब्रुवारी महीन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दिवसेंदिवस कोरोनाची संख्खा वाढत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागास अलर्ट राहण्याच्या सुचना दिल्या असुन आरोग्य यंत्रणा याकामी कार्य करित आहे. त्‍या दृष्‍टीने प्रशासनाने रात्रीचा लॉकडाउन जाहीर करत १५ मार्चपर्यंत मुदत देखील वाढविली आहे. शिवाय, बाजार भरण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. असे असताना देखील नियमांची पायमल्‍ली होत असल्‍याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

मग हा बाजार भरलाच कसा?
गुरांचा आठवडे बाजार बंद असतांना देखील गुरे व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली करत अमळनेर रोड लगत बकऱ्या, बैलांचा बाजार भरविला. यात विक्री करणारे व विकत घेणाऱ्यांनी तोंडाला मास्‍क न बांधता एकच गर्दी केली. पोलिस व पालिका कर्मचारी यांनी कारवाईची मोहिम हाती घेत विना मास्‍क व गर्दी करणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली. परंतु या कारवाईस देखील नागरीक जुमानले नाही. मुळात बाजार भरविण्यास बंदी असताना बाजार भरला कसा? हा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

व्यापारी अधिकाऱ्यांवर वरचढ
कारवाई करत असताना अनेक व्यापाऱ्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावीत आधीच गुरे विकले जात नाही. त्यात आपण दंडात्मक कारवाई करित आहे. त्यामुळे आमच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली असुन पोटाची खळगी कशी भरावी; असा प्रश्न निर्माण झाल्याचे अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.

विना मास्‍क फिरणाऱ्यांना खाकीचा हिसका 
बाजारात गर्दी होवु नये यासाठी रविंद्र बागुल व पोलिस कर्मचारी यांनी विना मास्‍क फिरणाऱ्यांना लोकांना तंबी देत दंडात्मक कारवाईचे संकेत दिले. दरम्यान पोलिस गाड्याच्या वाजणाऱ्या हाँर्नमुळे अनेकांची यावेळी भंबेरी उडाल्याचे दिसुन आले.

संपादन ः राजेश सोनवणे