
समाजात गोपुजन पुण्यकर्म मानले जाते. हा सेवाभाव ठेवत जीवनलाल जैन व घरातील पारीवारीक सदस्य आलेल्या गायीस पोळी देत नमस्कार करित होती.
पारोळा (जळगाव) : गेल्या अनेक वर्षापासून सेवा करित असलेला जीवनलाल जोधराज जैन व परिवार यांचे कोरोनाच्या संकट काळात परराज्यातील लोकांना महामार्गालगत अन्नदानाची सेवा करण्याचा अनुभव समाजाचा समोर आला.
महावीरनगर येथील दिनेश जैन व जैन नवयुवक मंडळाने सामाजिक या कठीण काळात बांधिलकी जोपासली. ही नित्यसेवा करित असतांना निराधार गायी ह्या महामार्गलगत येत असत. समाजात गोपुजन पुण्यकर्म मानले जाते. हा सेवाभाव ठेवत जीवनलाल जैन व घरातील पारीवारीक सदस्य आलेल्या गायीस पोळी देत नमस्कार करित होती. कालांतराने हे सेवा कार्य नित्याचे होवु लागल्याने निराधार गायींना पाण्याची व ढेपची सोय जैन परिवाराने करुन पशुसेवा हीच समाजसेवा हे सिध्द करुन दाखविले.
लॉकडाउनमध्येही मदतीचा हात
डिसेंबर महिन्यात कोरोनाचा शिरकाव जगात झाला. २२ मार्च रोजी सर्वत्र ताळेबंदी जाहीर झाली. यामुळे इतर राज्यात नोकरी करणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. बऱ्याच जणांना अनेक दिवस पायी तर काहींना सायकलीवर प्रवास करावा लागला. महामार्गालगत महावीरनगर येथील जैन नवयुवक मंडळाने अशा लोकांना अन्नदानाची सोय व इतर सुविधा पुरविण्याची सोय केली. तसेच शहरातील निराधार 150 ते 200 लोकांना रोजच जेवणाची व्यवस्था केली. ही सेवा सतत 5 ते 6 महिने अखंडीतपणे सुरु राहिली.
जैन परिवाराचे सेवेत सातत्य
कठीण काळात अन्नसेवा व इतर गरजु वस्तुंची उपलब्धी करुन देत जैन परिवाराने शहरात समाजसेवेचा वसा तेवत ठेवला. आज निराधार 15 ते 20 गाय व मोठी वासरे यांना पाण्याचा हौद व नित्य सायंकाळी पिठ व ढेप देवुन हा सेवाव्रत अखंडीतपणे ठेवली आहे. जैन परिवाराने सामाजिक बांधिलकीचा सेवायाग अखंडीतपणे सुरु ठेवला आहे. सामाजिक सेवेचे उपक्रम हाती घेत समाजाचे देणे यातुन उतराई करित असल्याचे दिसुन येत आहे. दरम्यान जैन परिवार यांचे नित्य गोसेवेचा उपक्रम शहरात नागरिकांना एक प्रेरणा देवुन जात असल्याचे नागरिकात बोलले जात होते.
संपादन ः राजेश सोनवणे