चिमुकल्‍या रामने दोन वर्ष सांभाळलेला गल्‍ला फोडला अन्‌ रक्‍कम काढून दिली श्रीराम मंदिरासाठी

संजय पाटील
Friday, 22 January 2021

श्रीराम मंदीराचे आयोध्यानगरीत भव्य महाकाय मंदिर उभारले जात असुन या कार्यात सर्वांचे योगदान असावे या भावनेतुन प्रत्येक तालुक्यात समर्पण निधी केंद्रे आहेत. यातून निधी संकलन करण्याचे काम सुरू करण्यात येत आहे.

पारोळा (जळगाव) : अयोध्येतील श्रीराम मंदिर बांधकामासाठी सर्वत्र समर्पण मदत निधी केंद्र उभारण्यात आले आहेत. प्रत्येक जण धार्मिक कार्यात योगदान यथाशक्तीप्रमाणे देत आहे. या भव्य मंदिर निर्माण कार्यात आपला देखील खारीचा वाटा असावा; या भावनेतून शहरातील डॉ. रविंद्र निकम यांचे सुपुत्र राम निकम यांने आई- वडीलांकडुन मिळालेल्या पैशांची बचत करुन गल्ला तर केला होता. तो कापुन त्यातील 1 हजार 621 रुपये मंदिर बांधकामासाठी कुटुंबियांनी दिल्याने संघाच्या कार्यकर्त्यांनी या चिमुकल्याचे योगदानाचे कौतुक केले.
श्रीराम मंदीराचे आयोध्यानगरीत भव्य महाकाय मंदिर उभारले जात असुन या कार्यात सर्वांचे योगदान असावे या भावनेतुन प्रत्येक तालुक्यात समर्पण निधी केंद्रे आहेत. यातून निधी संकलन करण्याचे काम सुरू करण्यात येत आहे.

गल्‍ला आणला आणि वडीलांसमोर ठेवला
आजवर अनेक दात्यांनी स्वयंस्फुर्तीने या सेवाकार्यात योगदान दिले आहे. या महाकार्यात आपले देखील योगदान द्यावे अशी चर्चा घरात सुरु असतांना चिमुकल्या रामने दोन वर्ष जिवापाड जपलेला पैशांचा गल्ला वडील डॉ. रविंद्र निकम यांचे पुढे आणला. तो म्हणाला कि, आपण मंदीर निर्माण कार्यात ही रक्कम देवु. हे ऐकुण परिवार अवाक झाला. लहानग्या वयात परमेश्वरी कार्यात एवढी निस्सिम निष्ठा पाहुन संघाचे कार्यकर्त्यांनी त्यांचे तोंडभरुन कौतुक करित चिमुकल्या जीवाचे योगदान नक्कीच नोंद घेण्यासारखे राहील असे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

55 हजार 555 चा धनादेश 
श्रीराम मंदीर निर्माण कार्यात सर्वजण मदत करित असुन या कार्यात किसन हिंदुजा यांचेकडून 55 हजार 555 एवढ्या रकमेचा धनादेश समर्पण समितीच्या प्रतिनिधीकडे देण्यात आला. महेश गृप हा नेहमीच विविध उपक्रमात अग्रेसर असुन आज धार्मिक कार्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे मान्यवर म्हणाले.

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news parola shree ram tempal ayodya littel ram help cash