त्‍यांच्या आवाजाची जादू; रेल्वेच्या पहिल्या उद्‌घोषिका चौधरींचा व्हिडिओ व्हायरल

त्‍यांच्या आवाजाची जादू; रेल्वेच्या पहिल्या उद्‌घोषिका सरला चौधरींच्या व्हिडिओ व्हायरल
voice of railway sarla choudhary
voice of railway sarla choudharysakal

यावल (जळगाव) : मुंबईकरांची जीवनवाहिनी (MUmbai local) म्हणून ओळख असलेल्या भारतीय रेल्वेच्या लोकलच्या वास्तवतेचे दर्शन प्रवाशांना उद्‍घोषणेद्वारे (railway announcer) करून प्रवाशांमध्ये लगबग व धावपळ निर्माण करणारी पहिली महिला उद्‍घोषक म्हणून ज्यांचा आवाज मुंबईकर चाकरमान्यांनी ऐकला, नव्हे तर तो अंगवळणी पडला, त्या पहिल्या महिला म्हणजे खानदेशातील यावल येथील सरला सुभाष चौधरी या होत. सौ. चौधरी यांचा एक व्हिडिओ व्हॉट्सअॅपच्या विविध ग्रुपवर व्हायरल होत असून, खानदेशवासीय या व्हिडिओला लाईक करून उत्स्फूर्त दाद देत आहेत. (jalgaon-news-railway-first-announcer-sarla-chaudhary)

voice of railway sarla choudhary
कोरोनाने आई गेली..महिनाभरानंतर डॉक्टर मुलाचाही मृत्यू

सौ. चौधरी सध्या कल्याणमध्ये राहतात. भारताने सर्वप्रथम रेल्वेस्थानकावर अनाउंसर म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. यावल येथील सुभाष चौधरी यांच्या त्या पत्नी आहेत. सौ. चौधरी यांचे वडील रेल्वेत नोकरी करायचे. १९८२ मध्ये रेल्वेचे एक परिपत्रक निघाले. त्यानुसार, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना तीन महिन्यांसाठी उद्‌घोषक म्हणून संधी मिळणार होती. सरला चौधरी यांनी त्यासाठी रेल्वेच्या कुर्ला पार्कसाइडमध्ये आवाजाची चाचणी दिली.

आरव्हीआर सिस्‍टिमने आवाज थांबला तरीही..

तीन महिन्यांसाठी टाइमपास होईल, या आशेवर आवाज चाचणीसाठी गेलेल्या सरला यांची उद्‍घोषक म्हणून निवड झाली. १३ जुलै १९८२ ला त्यांनी उद्‌घोषक म्हणून नोकरी सुरू केली. एका खानदेशकन्येचा आवाज, जो १९८२ पासून मुंबई उपनगरीय रेल्वेस्थानकावर रोज ऐकला जायचा व त्या आवाजावर प्लॅटफॉर्मवर सर्व लगबग व्हायची, तो आवाज १९९२ पर्यंत अव्याहत सुरू होता. परंतु १९९१ च्या सुमारास आयव्हीआर सिस्टिम आल्यानंतर तो आवाज थांबला. असे असले तरी, आजही हा आवाज सर्वांना परिचित आहे. आजही सौ. चौधरी रेल्वेत इलेक्ट्रिकल विभागात सेवा करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com