
अक्षरश: रुपया रुपया जमवलेल्या नारायण कोष्टी व भागाबाई कोष्टी यांनी मंदिरासाठी देणगी म्हणून दान दिले. याबाबतचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, संपूर्ण देशभरातून दातृवाला सलाम केला जात आहे.
सावदा (जळगाव) : उतारवयात पोटाची खळगी भरण्यासाठी पै पै जमा करून संचित केलेली रक्कम अयोध्या येथील श्रीराम मंदिर उभारणीसाठी दान म्हणून देणारे कुंभारखेडा येथील अत्यंत गरीब, वृद्ध भिक्षेकरी नारायण कोष्टी व भागाबाई कोष्टी यांनी १०० रुपयांचे योगदान दिले. या दाम्पत्याच्या दातृत्वाची देशभर चर्चा होत असून, अजित डोवाल, चंद्रकांत पाटलाकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.
श्रीराम मंदिर बांधकामासाठी देशभरात निधी संकलनाचे कार्य सर्वत्र सुरू आहे. याच निधी संकलनात कुभारखेडा (ता. रावेर) येथील अगदी आयुष्याच्या उत्तरार्धात असलेल्या नारायण कोष्टी व भागाबाई कोष्टी या अत्यंत हलाखीचे जीवन जगत असलेल्या दाम्पत्याने राम मंदिरासाठी दाखविलेल्या दातृत्वाची केवळ कुभारखेडा, चिनावल मंडळातच नव्हे तर संपूर्ण देशभरात सोशल मिडियाच्या माध्यमातून चर्चेत आले आहे.
दातृत्वाला होतोय सलाम
मंदिर उभारणीत आपलाही सहभाग असावा, यासाठी अक्षरश: रुपया रुपया जमवलेल्या नारायण कोष्टी व भागाबाई कोष्टी यांनी आपल्याकडील शंभर रुपये मंदिरासाठी देणगी म्हणून दान दिले. याबाबतचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, संपूर्ण देशभरातून दातृवाला सलाम केला जात आहे. विशेष म्हणजे, आपल्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांन देखील आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करून कोष्टी दाम्पत्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
सर्वात श्रीमंत व्यक्ती : जनार्दन महाराज
उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसताना अगदी आयुष्याच्या उत्तरार्धात केवळ श्रीरामापोटी असलेल्या आस्थेने नारायण कोष्टी व भागाबाई कोष्टी यांनी आपल्या उदरनिर्वाहाचेही न बघता साठवण केलेली रक्कम मंदिरासाठी दान दिली, हे त्यांचे दातृत्व सिद्ध करणारे आहे. ते माझ्या दृष्टीने एक सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत, असे गौरोदगार जनार्दन हरीजी महाराज यांनी काढले. या वेळी त्यांनी विहिंप जिल्हा मंत्री योगेश भंगाळे व स्थानिक कार्यकर्त्यांसह त्यांची
संपादन ः राजेश सोनवणे