
रावेर येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर येथील अकिल शाह जब्बार शाह याने सन 2015 मध्ये बलात्कार केल्या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात कलम पोक्सो, सहकलम-अनुसूचित जाती जमाती कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वेर (जळगाव) : येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस बारा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व 36 हजार 500 रुपये दंडाची शिक्षा भुसावळ सेशन कोर्टाने सुनावली आहे. सदर आरोपीस जळगावच्या सबजेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. या निकाला मुळे अशा गुन्हेगारांवर वचक बसणार आहे.
रावेर येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर येथील अकिल शाह जब्बार शाह याने सन 2015 मध्ये बलात्कार केल्या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात कलम पोक्सो, सहकलम-अनुसूचित जाती जमाती कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर केस भुसावळ येथील सेशन कोर्टात न्यायधिश श्री. भन्साळी यांच्या कोर्टात चालली असता सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील श्री. खडसे यांनी काम पाहिले. तर पैरवी अधिकारी म्हणून डब्ल्यूएचसी समीना तडवी यांनी मदत केली.
शिक्षेनंतर सबजेलमध्ये रवानगी
न्यायालयाने आज आरोपीस शिक्षा सुनावत बारा वर्ष सुक्त मजुरी व 36 हजार 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी योगेश चव्हाण यांनी केला होता. नमूद गुन्ह्यातील साक्षीदार यांना साक्ष देणेबाबत वारंवार उजळणी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी केली होती. न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमुळे अशा अप्रवृत्त कृती करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला आहे. सदर पीडित मुलीस न्याय मिळाल्याची भावना सर्वसामान्यातून निर्माण होत आहे. नमूद आरोपीची जळगाव सबजेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
संपादन ः राजेश सोनवणे