esakal | हिरव्यागार गवताऐवजी वाळूचे मैदान; सिमारेषा आखत सुरू झाले क्रिकेट
sakal

बोलून बातमी शोधा

cricket ground

क्रिकेट खेळायला अगदी लहान जागा असली तरी देखील लहान मुले तेथे खेळण्याचा आनंद घेतात. म्‍हणूनच गल्‍ली क्रिकेट हा खेळ देखील प्रसिद्ध आहे. पण क्रिकेट स्‍पर्धा घ्‍यायच्यात तर मोठे मैदान लागतेच. पण हे मैदान नदीच्या पात्रातही होवू शकते, हे युवकांनी दाखवून दिले. बारीक माती टाकून पिच तयार केली अन्‌ सिमा रेषा आखत क्रिकेट सुरू केले.

हिरव्यागार गवताऐवजी वाळूचे मैदान; सिमारेषा आखत सुरू झाले क्रिकेट

sakal_logo
By
ॲड. बाळकृष्ण पाटील

गणपूर (ता चोपडा) : खानदेशातील नद्या कधी काळी भर उन्हाळ्यातही वाहत असत. पण काळ बदलला, ऊन तापू लागताच; नद्या लुप्त होऊ लागल्या. आता तर नद्यांचे पात्र क्रिकेटचे मैदान झाले असून त्यावर खेळ रंगू लागले आहेत. 
तापी खानदेशातील सर्वात मोठी नदी. पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी सूर्यकन्या. पावसाळ्यात गावांना वेढा पाडणारी, रौद्र रूप धारण करणारी तापी उन्हाळा लागताच लुप्त होत कोरडी पडू लागते. त्यामुळे भर उन्हाळ्यात डांगर मळ्यांनी ल्यालेली हिरवाई आता दिसेनाशी झाली आहे. ती जागा क्रिकेटचे मैदान आणि कवायतीच्या मैदानांनी घेतली आहे. तापीच्या पाण्यावर होणारी बागायती त्यामुळे धोक्यात येत असली तरी कोरड्या नदीपात्राची वाळू उन्हापेक्षाही जास्त तापू लागली आहे. बागायती पेक्षाही जास्त पैसा देणाऱ्या वाळूच्या चोरीच्या घटना आणि उपसा अनेक वादाना तोंड फोडू लागला आहे. 

पण कोरड्या नदीतील आनंद
नदीतील पाणी कमी झाले की, नदी एका बाजूने वाहू लागते. या कोरड्या नदीत मात्र निर्माण होणारी मैदाने शरीर कमावण्यासह मनोरंजन आणि हौसेलाही गवसणी घालत आहेत, हेही तितकेच खरे! याच मैदानांवर आता तरुणाई धावण्यासह व्यायामही करू लागली असून त्यातून मिलिटरी भरतीला पाठबळ मिळू लागले आहे.

संपादन ः राजेश सोनवणे