esakal | उन्हाची तीव्रता वाढलीय..डोकेदुखी, अशक्तपणाकडे दुर्लक्ष करू नका; होऊ शकतो हा परिणाम 

बोलून बातमी शोधा

temperature heat, headaches

कोरोना महामारीचे संकट अधिक गंभीर होत असतानाच त्यासोबत सर्दी, खोकला, घसादुखी तसेच जुलाब उलट्यांसारखा त्रासही सुरू आहे. त्याशिवाय सातत्याने शरीरातून घाम बाहेर फेकला जात असल्याने ‘डिहायड्रेशन’ होण्याचे प्रमाणही वाढू लागले

उन्हाची तीव्रता वाढलीय..डोकेदुखी, अशक्तपणाकडे दुर्लक्ष करू नका; होऊ शकतो हा परिणाम 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता चांगलीच जाणवू लागली आहे. उन्हामुळे सातत्याने शरीरातून बाहेर पडणाऱ्या घामामुळे अशक्तपणा वाढतो. त्याशिवाय डोकेदुखीचे प्रमाणही वाढत. काहींची अवस्था हात-पाय गळाल्यासारखी होते. अशा वेळी प्रत्येक नागरिकाने कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे उपअधिष्ठाता तथा शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मारोती पोटे यांनी दिला आहे. 
अनेक चाकरमान्यांना, नागरिकांना काहीतरी कामासाठी बाहेर पडावे लागते. अशा वेळी काळजी घ्यावी. उन्हात बाहेर फिरताना गॉगल वापरणे, डोक्यावर टोपी किंवा साधा रुमाल वापरणे आवश्यक आहे. कोरोना महामारीचे संकट अधिक गंभीर होत असतानाच त्यासोबत सर्दी, खोकला, घसादुखी तसेच जुलाब उलट्यांसारखा त्रासही सुरू आहे. त्याशिवाय सातत्याने शरीरातून घाम बाहेर फेकला जात असल्याने ‘डिहायड्रेशन’ होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. त्यामुळे बाहेर करावयाच्या कामांचे व्यवस्थित नियोजन करावे. मगच बाहेर जावे, जेणेकरून कमीत कमी घराबाहेर पडणे होईल. उन्हातून बाहेरून आल्यावर लगेच पाणी पिऊ नये. पाच ते दहा मिनिटांनंतर प्यावे. घरी व कार्यालयात नेहमी फ्रीजचे थंड पाणी टाळावे. नेहमी माठातील पाणी पिण्यास प्राधान्य द्यावे. 

सतत पाणी प्या..
उन्हात फिरून आल्यानंतर दुपारी मसालेदार पदार्थ खाणे टाळावे, यामुळे पोटाचे विकार बळावण्याची शक्यता अधिक असते. उन्हामुळे शरीर गळून गेल्यासारखे वाटते. चक्कर येणे, अशक्तपणाबरोबर डोकेदुखी अशी लक्षणे जाणवतात. अशा वेळी सातत्याने पाणी पीत राहणे, लिंबू सरबत, कोकम, नारळपाणी अथवा फळांचा रस प्यावा. ताक, मठ्ठा, कैरीचे पन्हे प्यावे. मेडिकल स्टोअरमधून इलेक्ट्रॉल पावडर, ओआरएस घ्यावे.