हळदीला आठ हजाराच्या दराने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू 

Turmeric
Turmeric
Updated on

वावडे (जळगाव) : अमळनेर तालुक्‍यातील वावडे परिसरात हळद, ऊस आणि केळी या पिकांचे उत्पादन अधिक प्रमाणात घेण्यात येते. मात्र मागील काही काळात चांगला भाव मिळत नव्हता. त्यामुळे उत्पादक शेतकरी हवालदिल झाले होते. आता मात्र हळदीला विदेशात व देशांतर्गत मागणी वाढल्याने दरामध्ये तेजी दिसून येत आहे. प्रतिक्विंटल साडेसहा ते आठ हजारापर्यंत दर मिळत असल्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कोरोना आणि टाळी बंदीचा फटका शेती व्यवसायालाही बसला. हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी प्रतिक्विंटल केवळ चार ते साडेचार हजार इतका दर मिळत होता. हा मागील दहा वर्षातील सर्वात कमी दर होता. हळद हे पीक प्रामुख्याने सौंदर्यप्रसाधने आणि औषध निर्मितीसाठी उपयुक्त असणारे नगदी पीक आहे. हळद ऊसाला पर्यायी पीक असून हळदीचे पीक उसापेक्षा कमी पाण्यावर येणारे आहे. त्यामुळे शेतकरी हळदीची लागवड करत आहे.

सरासरी खर्च ६० हजारापर्यंत
हळदीच्या लागवडीपासून काढणीपर्यंत साधारणपणे दहा ते अकरा महिन्यांचा कालावधी लागतो. सामान्यपणे लागवड ते काढणीपर्यंतचा सरासरी एकरी खर्च ५० ते ६० हजारापर्यंत येतो. यामध्ये बियाणे खरेदी, लागवड, खते, औषधे फवारणी, मजुरी, काढणी आणि हळद काढल्यानंतर शिजवणे तसेच फिनिशिंग प्रक्रियेपर्यंतचा खर्च समाविष्ट आहेत. हळदीचे चांगले उत्पन्न झाले; तर ते एकरी २५ ते ३० क्विंटलपर्यंत दर मिळतात. साधारणपणे प्रति क्विंटलला तीन हजार लागवड ते वाटणीपर्यंतचा खर्च येतो. हे सर्व गणित विचारात घेता हळदीला किमान सात ते आठ हजार रुपये भाव मिळाला; तरच ते शेतकऱ्यांना परवडते. त्यापेक्षा कमी पाहायला मिळाला तर उत्पादनाचा खर्चही निघत नाही.

दर टिकून राहण्याची शक्‍यता
पश्चिमात्य देशात कोरोनाची परिस्थिती अजूनही म्हणावी तितकी आटोक्यात आलेले नाही. हळद हे रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे पीक असल्यामुळे विदेशातही मागणी वाढत आहे. त्यामुळे निर्यातही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे देशातील उत्पादनही घटनार त्याच देशात मागणी वाढली आहे. त्यामुळे हळदीचे दर टिकून राहतील; अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. टाळेबंदीच्या काळात शेतकऱ्यांना हळदीला तेजी मिळत असल्याने दिलासादायक चित्र आहे.

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Marathi News Esakal
www.esakal.com