esakal | ‘कोरोना’ लसीचे दोन डोस; जळगावात जानेवारीत येणार लस
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

लसीकरण झाल्यानंतर महिनाभरात संबंधित व्यक्तीवर काय परिणाम होतात. विपरीत परिणाम झाले नाही तर लागलीच दुसरा डोस दिला जाणार आहे. 

‘कोरोना’ लसीचे दोन डोस; जळगावात जानेवारीत येणार लस

sakal_logo
By
देवीदास वाणी

जळगाव : कोविड संसर्गापासून बचाव करण्यासाठी कोरोना लसीकरण जिल्ह्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केले जाणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून कोरोना लसीकरणाचे किट लवकरच जिल्ह्यात येणार आहे. कोरोना लसीकरणाचा क्रम अगोदरपासूनच ठरला असल्याने सर्वांत अगोदर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. लसीकरणाचा पहिला डोस दिल्यानंतर एका महिन्यानंतर लागलीच दुसरा डोस दिला जाणार आहे. 

जगभरात हाहाकार उडविणाऱ्या कोरोनावर येणाऱ्या लशीचे संशोधन अंतिम टप्प्यात असून, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात लस जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवडाभरात देशात लस उपलब्ध होण्याचे संकेत दिले आहेत. 

माहिती संकलित
लसीकरणाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शासकीयसह खासगी रुग्णालयांतील डॉक्टर, नर्सेस, इतर स्टाफ, अधिकारी यांची माहिती केंद्र सरकारला जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा आरोग्य यंत्रणेद्वारे माहिती संकलित करण्यात येत आहे. सुमारे १५ हजार डॉक्टर, नर्स, इतर स्टाफ, लॅब टेक्निशियन, असिस्टंट आदींची माहिती संकलित करण्यात आली आहे. ती राज्य शासन व केंद्र सरकारकडे पाठविली आहे. कोरोनाचा जवळचा संबंध आरोग्य विभागात काम करणाऱ्या सर्वच घटकांशी येतो. यामुळे आरेाग्य क्षेत्रातील सर्वांना कोरोना लसीकरण अगोदर केले जाणार आहे. जिल्हा रुग्णालयातर्फे अशी माहिती एकत्रितरीत्या संकलित करून ती संगणकावर भरली गेली आहे. 
 
जिल्ह्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोन लस येणार आहे. सर्व खासगी व शासकीय आरोग्याधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्स, इतर स्टाफला ही लस अगोदर दिली जाणार आहे. १५ हजार जणांचे प्रथम लसीकरण करण्यात येईल. 
-डॉ. एन. सी. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image