दोन लाखांची लाच भोवली; तहसीलदारासह दोघे रंगेहाथ

राजेश सोनवणे
Friday, 18 December 2020

उताऱ्याबाबत तहसीलदार, बोदवड यांनी हरकत घेऊन संबंधीत पुरावा देण्याची नोटीस काढली. सदर नोटीस रद्द करण्यासाठी तहसीलदारांच्यावतीने मंडळाधिकारी व सर्कल यांनी सुरूवातीला पाच लाख रुपयांची मागणी केली होती;

भुसावळ (जळगाव) : शेतीच्या उताऱ्यासाठी काढलेली नोटीस परत घेण्याच्या मागणीसाठी दोन लाखांची लाच मागितली होती. याप्रकरणी बोदवड तहसीलदारांसह मंडळाधिकारी व तलाठ्यास जळगाव एसीबीच्या पथकाने लाच घेताना तहसील कार्यालयात रंगेहाथ पकड

फैजपूर येथील तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे 2002 मध्ये बोदवड तहसीलच्या हद्दीत शेत खरेदी केले. या शेतीचा 7/12 उताऱ्यावर त्यांच्या पत्नीचे नाव लावण्यात आले. मात्र कालांतराने या शेतीच्या उताऱ्यावर परत मूळ मालकाचे नाव आल्याने तक्रारदार यांनी मंडळाधिकारी यांना भेटुन पुन्हा उताऱ्यावर त्यांच्या पत्नीचे नाव लावले व उतारा घेतला. या उताऱ्याबाबत तहसीलदार, बोदवड यांनी हरकत घेऊन संबंधीत पुरावा देण्याची नोटीस काढली. सदर नोटीस रद्द करण्यासाठी तहसीलदारांच्यावतीने मंडळाधिकारी व सर्कल यांनी सुरूवातीला पाच लाख रुपयांची मागणी केली होती; मात्र तडजोडीत दोन लाख देण्याचे ठरले.

तिनही अडकले
तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली. या प्रकरणी पडताळणी करण्यात आल्याने सापळा लावून यशस्वी करण्यात आला. यात मंडळाधिकाऱ्यांनी लाच स्वीकारताच ताब्‍यात घेतले. तक्रार दाखल केल्‍यानंतर सापडा रचत लाच मागणाऱ्या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले. यात तहसीलदार हेमंत भागवत पाटील (40, रा.भरडी, ता.जामनेर, ह.मु.बोदवड), मंडळाधिकारी संजय झेंडू शेरनाथ (47, भुसावळ) व तलाठी निरज प्रकाश पाटील (34, हेडगेवारनगर, बोदवड) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सदरची कारवाई नाशिकचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस निरीक्षक निलेश लोधी यांच्या पथकाने यशस्‍वी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news two lakh bribe officer arrested lcb