esakal | अवैध वाळू उत्खननाची पाहणी सुरूच; एरंडोल, आव्हाणी गटाची मोजणी
sakal

बोलून बातमी शोधा

valu chori sakal impact

अवैध वाळू उत्खननाची पाहणी सुरूच; एरंडोल, आव्हाणी गटाची मोजणी

sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव : जिल्ह्यातील नदीपात्रातून (girna river) वाळूचा अधिकृत व अनधिकृत अशा दोन्ही प्रकारच्या उपशाची तपासणी अजून दोन दिवस सुरूच राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व वाळू गटांची (valu gat) तपासणी करून नंतर अहवाल तयार करण्यात येणार आहे. (jalgaon news valu chori deputy collector watch)

गिरणासह विविध नद्यांमधून प्रमाणापेक्षा अधिक उपसा झाल्याचे वृत्त ‘सकाळ’ने नुकतेच प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत मंगळवारी (ता. ४) अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, महसूल उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, इतर महसूल अधिकारी, बांधकाम विभागाचे अभियंता, पाटबंधारे विभागाचे अभियंता यांनी गिरणा नदीपात्रातील वाळू उपशाचा पाहणी करीत निरीक्षणे नोंदविण्यास सुरवात केली आहे. आज दुसऱ्याही दिवशी वाळूच्या गटांची मोजणी सुरूच होती. गिरणा नदीपात्रातील बांभोरी, धरणगाव, आव्हाणी, एरंडोल, धरणगाव आदी ठिकाणच्या वाळू गटातील उपाशाची पाहणी करून मोजणही केली जात आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात ७१ हजार लशी उपलब्ध; थांबलेले लसीकरण उद्यापासून

वाळू गटांची पाहणी

बुधवारी (ता. ५) उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, जिल्हा गौण खजिन अधिकारी दीपक चव्हाण, बांधकाम विभागाचे पथक, जलसंपदा विभागाचे पथक, पर्यावरण विभागाचे पथक आदी पथकांतर्फे वाळू गटांचे मोजमाप केले जात आहे. थेट नदीपात्रात जाऊन प्रत्येक वाळू गटाची पाहणी केली. दिलेला वाळू ठेका, झालेले उत्खनन, कोरोना संसर्ग नियमांचे मजूर पालन करताहेत अथवा नाही याची पाहणी केली जात आहे.