esakal | समांतर महामार्ग, जंक्शन पॉइंटचा प्रश्न मार्गी लागणार

बोलून बातमी शोधा

railway juntion point
समांतर महामार्ग, जंक्शन पॉइंटचा प्रश्न मार्गी लागणार
sakal_logo
By
टिम इ सकाळ

वरणगाव (जळगाव) : केंद्र शासनाच्या नियोजनानुसार महामार्गाचे शहराबाहेरून झालेले चौपदरीकरण लक्षात घेता वरणगाव शहरातून किंवा कठोरा मार्गावरून वाहनधारकांना महामार्गावर येण्या-जाण्यासाठी व्यवस्था नसल्याने भविष्यात अडचणी निर्माण होणार आहेत. या दृष्टीने व शहरातून गेलेल्या महामार्गाचे नष्ट होणारे अस्तित्व कायम राहावे, यासाठी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांचा पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू असल्याने मंगळवारी (ता. २७) महामार्ग प्राधिकरणाचे संचालक सी. एम. सिन्हा व आमदार संजय सावकारे यांनी दोन्ही स्थळांची पाहणी करून पुढील कार्यवाहीसाठी आदेश दिले.

भारतीय जनता पक्षाच्या पाठपुराव्याने फुलगावपासून ते बसस्थानक चौक मार्गे साईबाबा मंदिरापर्यंत दुभाजकासह पथदिवे बसवून समांतर महामार्ग व कठोरा मार्गावरील रावजी बुवा दरम्याननवीन बायपास चौरपदरी महामार्गावर जंक्शन पॉइंट तयार करा, तसेच फुलगाव येथील रेल्वेगेट कायम सुरू ठेवा बायपासच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रस्ता तयार करा, या मागणीसाठी पक्षाच्या वतीने माजी नगराध्यक्ष काळे, उपनगराध्यक्ष शेख आखलाक, भाजप शहराध्यक्ष सुनील माळी, भाजयुमो शहराध्यक्ष संदीप भोई, उपाध्यक्ष हितेश चौधरी, आकाश निमकर, मिलिंद भैसे, गजानन वंजारी, भाजप नेते माजी सभापती राजेंद्र चौधरी, कठोरा सरपंच प्रशांत पाटील, राजकुमार चौधरी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मंत्री आमदार संजय सावकारे, खासदार रक्षा खडसे यांना निवेदन देऊन पाठपुरावा केलेला असताना वरणगाव शहर भाजपच्या निवेदनाची प्रशासनाने दखल घेऊन मंगळवरी (ता. २७) आमदार संजय सावकारे, प्रकल्प संचालक सिन्हा यांनी प्रत्यक्ष वरणगाव समांतर महामार्गाच्या व कठोरा जंक्शन व फुलगाव रेल्वेगेट सुरू राहिले पाहिजे, यासाठी स्थळावर येऊन पाहणी केली. या वेळी महामार्ग प्राधिकरण विभाग संचालक सिन्हा यांनी आपल्या विभागांच्या अभियंत्यांना कडक सूचना केल्या. वरणगावकरांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्नशील आहेच, शहरातून गेलेल्या महामार्गाचे अस्तित्व कायम राहील व कठोरा मार्गावरील रावजी बुवा दरम्यान जंक्शन पॉइंट लवकरच निर्माण केले जाईल, असे सिन्हा यांनी आश्वासन दिले.

अन्याय सहन करणार नाही : सावकारे

वरणगावकरांवर अन्याय तर होऊ देणार नाहीच, पण होत असलेला अन्याय देखील सहन करणार नाही. तुम्ही काहीही करा, मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी हवं तर बोलतो, मात्र फुलगाव ते साईबाबा मंदिर दरम्यान समांतर महामार्ग दुभाजक व पथदीप, बसस्थानक चौकात सर्कल निर्मिती तसेच कठोरा रावजी बुवा दरम्यान जनतेला महामार्गावर चढण्यासाठी जंक्शन पॉइंट तयार झालेच पाहिजे, अशी कडक भूमिका आमदार सावकरे यांनी घेतल्याने प्रकल्प संचालक सिन्हा यांनी या वेळी जनहिताच्या भावनेची दखल घेऊन काम मार्गी लावण्याचे या वेळी भाजपच्या शिष्टमंडळाला सांगितले.