चक्क विहीरीत डोंगरासारखी वाढतेच वनस्पती; पळासरे येथील गुढ प्रकार

mountain in a well
mountain in a well
Updated on

मेहुणबारे (जळगाव) : विविध जातीचे वनस्पती, वृक्ष बहारणे काही नवीन नाही. निसर्गचक्राप्रमाणे ते चालत येते. पण वरखेडे (ता.चाळीसगाव) शेतकर्याचे मात्र निसर्गाला चक्रावून टाकणारा आणि वनस्पती संशोधकांना आव्हान ठरणारा प्रकार समोर आला आहे. येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील विहीरीखालून चक्क डोंगराच्या आकारासारखा हिरवेगार वृक्ष वाढत असल्याचे दिसून येत आहे.या गुढ, रहस्यमय प्रकाराची परिसरात चर्चा असून संबंधीत विभागाने याचा शोध घेऊन खरे कारण शोधून काढावे अशी मागणी होत आहे.

वरखेडे (ता.चाळीसगाव) येथील शेतकरी आनंदा चिंधा गवारे यांची शेती पळासरे शिवारात असून या शेतात 20 फूट विहीर गेल्या वर्षी खोदली होती. मागील वर्षी पाणी नसल्याने तिचा वापर होत नव्हता. मात्र यंदा विहरीला  चांगले पाणी आहे.या 20 फूट खोल विहिरीत अगदी तळापासून एक आगळी वेगळी वनस्पती खालपासून वरपर्यंत वाढत आहे. अगदी हिरवळीने नटलेला जसा डो डोंगरासारखी ही वनस्पती असून तिचा वाढणारा आकार पाहून माणूस आश्चर्यचकीत होतो.विशेष म्हणजे विहीरीच्या पाण्यावर डोंगरासारखी दिसणारी ही विहीरीत पाण्यात तरंगतांना दिसून येते. एखादा लहानसा दगड जर विहीरीत मारून फेकला तर तो दगड अगदी विहिरीच्या तळाशी जातो.

डोंगरासारखी वनस्पती
वरखेडे (ता.चाळीसगाव)येथील शेतातील विहीरीत दिवसेंदिवस वनस्पतीचा आकार तळापासून वाढत आहे.या अदभूत आणि आश्चर्यकारक प्रकारामुळे परिसरातील नागरीकही अवाक झाले आहे.चक्क विहीरीतून डोंगराच्या आकारासारखी वनस्पती अवतीर्ण झाल्याने ते वनस्पती संशोधकांना ते मोठे आव्हान असल्याची परिसरात चर्चा आहे. 

अपरिचीत वनस्पती 
जंगलात आतापर्यंत अनेक दुर्मिळ वनस्पती वा वृक्षे जमिनीवर उगवल्याचे समोर आले आहे. पण एखाद्या 20 फूट खोल विहिरीतून अगदी तळापासून अपरिचीत वनस्ती वाढत वाढत जावून तिचा आकार डोंगरासारखा भासावा याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. जणु काही ही वनस्पती या विहीरीतून बाहेर पडण्यासाठी धडपड करीत आहे असे पाहील्यावर लक्षात येते.

माझ्या विहीरीत वाढत असलेली वनस्पती ही खुप वेगळीच दिसत आहे.वनस्पतीचा वाढत असलेला आकार पाहुन विहिर हिरवळीने नटलेली दिसत आहे.या विहीरीत असलेली वनस्पतीचा मात्र शोध लावणे कठीण झाले आहे.  
- आनंदा गवारे, शेतकरी वरखेडे (ता.चाळीसगाव)

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com