esakal | विकेंड लॉकडाऊन..जळगाव जिल्‍ह्‍यात उद्यापासून काय असेल स्‍थिती
sakal

बोलून बातमी शोधा

weekend lockdown

जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या सोमवार ते शुक्रवारचे निर्बंध (ब्रेक दि चेन) यापुर्वीच जाहीर केले होते. तर शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत विकेंड लॉकडाऊन जाहीर केला होता. 

विकेंड लॉकडाऊन..जळगाव जिल्‍ह्‍यात उद्यापासून काय असेल स्‍थिती

sakal_logo
By
देवीदास वाणी

जळगाव : जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग वाढीला आळा बसण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विकेंड लॉकडाउन जाहीर केला आहे. त्याची अंमलबजावणी आज रात्री आठपासून (ता.८) सुरू झाली आहे. अगोदर जे निर्बंध लावले होते. त्या केवळ अत्यावश्‍यक सेवेचीच दुकाने सुरू होती. विकेंड लॉकडाऊनमध्यही अत्यावश्‍यक सेवांची दुकाने सुरू राहतील. 
नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास, बगिच्यात फिरण्यास, उपक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. जे नागरिक अत्यावश्‍यक सेवेत असतील त्यांना ओळखपत्र जवळ बाळगणे सक्तीचे करण्यात आले आहे. अत्यावश्‍यक कारणाशिवाय संचारबंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या सोमवार ते शुक्रवारचे निर्बंध (ब्रेक दि चेन) यापुर्वीच जाहीर केले होते. तर शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत विकेंड लॉकडाऊन जाहीर केला होता. 

हे असणार सुरू
- किराणा दुकाने, भाजीपाला, फळ विक्री, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने 
- हॉस्पिटल्स, रोगनिदान सेंटर्स, क्लिनिक्स, औषध विक्री 
- रेल्वे, टॅक्सी, ऑटो, बससेवा 
- मॉन्सूनपूर्व कामे, कृषी संबंधित सेवा 
- सार्वजनिक सेवा, माल वाहतूक 
- पेट्रोलपंप, गॅरेज, कार्गो सेवा 
- शासकीय, खासगी सुरक्षा सेवा 
- को-ऑपरेटिव्ह, खासगी बँका, वीज वितरण, टेलिकॉम, विमा कंपन्या 
- कोरोना लसीकरण 
- सर्व शासकीय कार्यालये 
- वीज, पाणी, बँकिंग, वित्तीय संस्था 

हे राहणार बंद 
- सर्व रेस्टॉरंट, हॉटेल्स, बार (फक्त होम डिलीव्हरी सेवा) 
- खासगी बसेस, वाहने (कामगारांसाठीचे वाहने सुरू राहतील) 
- सर्व खासगी कार्यालये, मनोरंजन पार्क, 
- बगीचे, नाट्यगृहे, मैदाने 
- सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे 
- स्पा, सलून, ब्यूटीपार्लर 
- सर्व धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम 
- उघड्यावरील पदार्थ विक्री 

संपादन- राजेश सोनवणे