पारोळा पालिकेच्या समितीवर महिलाराज

संजय पाटील
Wednesday, 20 January 2021

पारोळा नगरपालिकेची विषय समितीच्या सभापतीची निवड निवडणुक निर्णय अधिकारी तहसिलदार अनिल गवांदे यांचे अध्यक्षेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली.

पारोळा (जळगाव) : नगरपालिकेच्या विषय समितीची निवड व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीने झाली. यात तीन समितीत्यांची जबाबदारी महिला नगरसेविकांकडे सोपविण्यात आली असुन आरोग्य समितीचा जबाबदारी नवल चौधरी यांचेकडे जाहीर करण्यात आले.
पारोळा नगरपालिकेची विषय समितीच्या सभापतीची निवड निवडणुक निर्णय अधिकारी तहसिलदार अनिल गवांदे यांचे अध्यक्षेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. बैठकीस मुख्याधिकारी ज्योती भगत यांचेसह नगरसेवक दीपक अनुष्ठान, प्रदीप पाटील, मंगेश तांबे, छाया पाटील, मनीष पाटील, प्रकाश महाजन, बापू महाजन, सुनीता शिरोळे, जयश्री बडगुजर, कैलास चौधरी, पालिकेचे कार्यालयीन अधिक्षक संघमित्रा संदानशिव, सुभाष थोरात व कर्मचारी उपस्थित होते. तहसिलदार गवांदे यांनी जाहिर केलेल्या बिनविरोध समिती सभापती यात आरोग्य सभापती नवल चौधरी (भाजप), महिला व बालकल्याण सभापती अंजली पाटील (भाजनप), बांधकाम सभापती रेखाबाई चौधरी (भाजप) आणि पाणीपुरवठा सभापती म्‍हणून वैशाली पाटील (शिवसेना) यांची नावे घोषित करण्यात आली. यावेळी नुतन समिती सभापतीचे अभिनंदन लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील, उपनगराध्यक्ष जयश्री बडगुजर यांचेसह नगरसेवकांनी केले.

अनुष्ठान यांचे आरोग्य समितीचे कार्य कौतुकास्पद - नगराध्यक्ष पाटील 
सलग तीन वर्ष आरोग्य समितीचे सभापती दिपक अनुष्ठान यांनी शहरातील आरोग्याचे प्रश्न तसेच दैनंदिन स्वच्छतेकडे विशेष लक्ष देवुन आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. सतत गरजु समस्या तसेच स्वच्छता कर्मचारी यांचेकडुन शहरातील कामांचा आढावा यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले. त्यामुळे त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नगराध्यक्ष करण पाटील यांनी बोलतांना सांगितले.

उद्या उपनगराध्यक्ष निवड 
येथील उपनगराध्यक्ष जयश्री बडगुजर यांच्या कार्यकाळ संपल्याने रिक्त जागेवर उद्या (ता.२१) तहसिलदार अनिल गवांदे यांचे अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात निवड होणार आहे. नगराध्यक्ष करण पाटील कुणाच्या गळ्यात उपनगराध्यक्षाची माळ घालतात; याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news women on the committee of parola municipality