esakal | माणुसकीचे दर्शन..सहा तास बेशुद्धावस्‍थेत महिला बेवारस; तरूणाने पोहचविले रूग्‍णालयात 

बोलून बातमी शोधा

women unconscious

वयोवृद्ध जावुबाई मंगा भिल्ल (वय ६५, रा.कोळवद ता. यावल) ही परितक्‍ता असलेली महीला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जळगाव जनता सहकारी बँकेत घेण्यासाठी आली. परंतु, बॅंकेच्या बाहेर समोरील दुकानाच्या ओट्यावर ती बेशुद्ध अवस्थेत पडुन होती.

माणुसकीचे दर्शन..सहा तास बेशुद्धावस्‍थेत महिला बेवारस; तरूणाने पोहचविले रूग्‍णालयात 
sakal_logo
By
राजु कवडीवाले

यावल (जळगाव) : सर्वत्र कोरोना विषाणु संसर्गाच्या सावटाखाली प्रत्येक व्यक्‍ती वावरत आहे. अशात कोणाला मदत करावी की नाही; असा प्रश्‍न प्रत्‍येकाच्या मनात उभा राहतो. असेच उदाहरण यावल शहरात बहुतेकांकडून माणुसकी शुन्य घटनेचे दर्शन घडले. पण एका तरूणाने माणूसकी शून्यतेला छेद देत माणूसकी अजूनही जीवंत असल्याचा प्रत्यय दाखवून दिला. 
वयोवृद्ध जावुबाई मंगा भिल्ल (वय ६५, रा.कोळवद ता. यावल) ही परितक्‍ता असलेली महीला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जळगाव जनता सहकारी बँकेत घेण्यासाठी आली. परंतु, बॅंकेच्या बाहेर समोरील दुकानाच्या ओट्यावर ती बेशुद्ध अवस्थेत पडुन होती. शहरातील प्रमुख बाजारपेठ व वर्दळीचा परिसर असतांना देखील ही महीला कोण? ती अशा अवस्थेत का पडली आहे अशी साधी विचारपुस देखील कुणी केली नाही. 

सहा तासानंतर विचारपूस
अखेर सहा ते सात तासानंतर येथील मनसेचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर हे त्या मार्गाने जात असतांना सदरची महीला त्यांना दिसुन आली. अढळकर यांनी माणुकीसचे दर्शन घडवत संपर्कातील मंडळींना तात्‍काळ फोन करून वृद्ध महिलेस उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालयात कसे पाठवता येईल यासाठी प्रयत्न केले. सदरची महीला कोळवद येथील राहणारी असल्याने अढळकर यांनी भाजपचे माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती हर्षल पाटील यांच्याशी आणि भाजपचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे यांच्याशी संपर्क साधल्याने दोघ ही तत्काळ हजर झाले. 

अन्‌ महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह
सर्वांनी मिळून रिक्षा बोलवुन वृद्ध महिलेस येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी वेद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला, परिचारिका प्रियंका महाजन यांनी उपचारास सुरूवात केली. उशीराने त्या महिलेची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटीव्ह निघाल्याने महिलेस जळगाव येथे पाठविण्यात आले आहे. सदर महिलेस वेळेवर उपचार मिळाले नसते, किंवा ती रात्रभर त्याच ओट्यावर बेवारस पडून राहिली असती तर तिचा मृत्‍यू होण्याची शक्‍यता अधिक होती.

संपादन- राजेश सोनवणे