जिल्ह्यातील या मतदार संघाला सर्वाधिक मिळाला पिकविमा...वाचा सविस्तर !

उमेश काटे
गुरुवार, 16 जुलै 2020

अमळनेर महसूल मंडळात 8 मंडळासाठी 53कोटी 376 लाख तर पारोळा महसूल मंडळात बहादरपुर व शेळावे मंडळातील शेतकऱ्यांना 10 कोटी 10 लाख रुपये रक्कम पीक विम्याचा लाभ मिळाला आहे.

अमळनेरः तालुक्यासह मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील दोन मंडळांना देखील कापूस पिकविम्याचा लाभ झाला एकूण 10 मंडळात 63.86 कोटी रुपये रक्कम प्राप्त झाली आहे. असून जिल्ह्यात सर्वाधिक पीकविमा अमळनेर मतदारसंघात मिळाला आहे 

अमळनेर महसूल मंडळात 8 मंडळासाठी 53कोटी 376 लाख तर पारोळा महसूल मंडळात बहादरपुर व शेळावे मंडळातील शेतकऱ्यांना 10 कोटी 10 लाख रुपये रक्कम पीक विम्याचा लाभ मिळाला आहे. शेळावे व बहादरपुर मंडळ मिळुन एकुण 1890 हेक्टर क्षेत्रातील 5290 शेतकऱ्यांना लाभ प्राप्त झाला आहे तर अमळनेर तालुक्यातील 8 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना एकूण एकूण 24हजार 573 हेक्टर क्षेत्रातील 25 हजार 125 शेतकऱ्यांना 53 कोटी 76 लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सतत अवर्षणप्रवण व अतिवृष्टीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री दादा भुसे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नाने ही रक्कम मिळाली असून आमदार अनिल पाटील यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षी बसलेला फटका व व चार वर्षे सहन केलेला दुष्काळ यात मोठा दिलासा मिळाला आहे.

अमळनेर मतदारसंघातील 10 मंडळांना 63.86 कोटी पीकविमा 
साठी आमदार अनिल पाटील यांच्या पाठपुराव्याने यश आल्याचे पत्रक शिरूड येथील शेतकरी नेते प्रा सुभाष पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे. मतदारसंघात बाहेरचे आमदार निवडत असल्याने गेली पाच वर्षे शेतकरी वर्ग पीकविमा व नुकसानभरपाई यापासून मोठ्या प्रमाणावर उपेक्षित होता. त्यामुळे गेली चार वर्षे देखील दुष्काळी निघाली मात्र शेतकरी वर्ग विविध नुकसानभरपाई पीकविमा यापासून वंचित राहिला. यावेळी स्थानिक भूमीपुत्राच्या झोळीत स्थानिक जनतेने भूमिपुत्र आमदार विजयी केला तसा पाऊसही विक्रमी पडला त्यात विविध पिकांचे मोठ्या नुकसान झाले अतिवृष्टी झाली अवकाळी झाला. महसूल व कृषी आणि पंचायत समिती अधिकाऱ्यांना थेट बांधावर पाठवत पंचनामे झाले. वेळेवर प्रस्ताव पाठवले आदी कामे अचूकपणे आमदार अनिल पाटील यांनी स्वतः लक्ष देऊन केल्याने हे यश प्राप्त झाल्याचे प्रा सुभाष पाटील यांनी सांगितले  

मंडळनिहाय मिळालेला पीकविमा 
अमळगाव 21 हजार 559 हेक्टरी रक्कम
अमळनेर 23 हजार 815 हेक्टरी रक्कम
भरवस 21 हजार 293 हेक्टरी रक्कम
मारवड 22 हजार 467 हेक्टरी रक्कम
नगाव 23 हजार 310 हेक्टरी रक्कम
पातोंडा 23 हजार 270 हेक्टरी रक्कम
शिरूड 21468 हेक्टरी रक्कम
वावडे 22401 हेक्टरी रक्कम
बहादरपूर 15 हजार 271 हेक्टरी रक्कम
शेळावे 18 हजार 86 रुपये हेक्टरी रक्कम

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner constituency in the district got the highest crop insurance