esakal | कोरोना काळात "आठ डॉक्टरांचे देवदूत कुटुंब" ठरतेय प्रेरक

बोलून बातमी शोधा

doctor
कोरोना काळात "आठ डॉक्टरांचे देवदूत कुटुंब" ठरतेय प्रेरक
sakal_logo
By
उमेश काटे

अमळनेर : कोरोना महामारी च्या काळात डॉक्टरांचे अस्तित्व किती महत्त्वाचे आहे याची जाणीव प्रत्येकालाच झाली आहे, हे डॉक्टर सद्यस्थितीत अनेकांसाठी देवदूतच ठरत आहे. अशा या विदारक परिस्थितीत तब्बल 'आठ डॉक्टरांचे कुटुंब" सध्या वेगळ्याच चर्चेत आले आहे. देवदूताचे हे अख्खे कुटुंब कोरोना काळात रुग्णासाठी आधारवड ठरत असून इतरांसाठी प्रेरक ठरत आहे.

आपल्या घरात एखादी व्यक्ती डॉक्टर झाली की आपली छाती अभिमानाने फुलून येते. पण जर एकाच घरातील 8 सदस्य डॉक्टर असतील तर? तर आश्चर्यचकीत होऊन बोटे तोंडात गेल्याशिवाय राहणार नाही. एवढे मात्र निश्चित! अमळनेरमध्ये एक असं कुटुंब आहे की, ज्या कुटुंबातील एक दोन नव्हे तब्बल 8 जण डॉक्टर आहेत. येथील पालिकेचे निवृत्त कर्मचारी तथा माजी उपनगराध्यक्ष रामदास दौलत शेलकर यांचे हे कुटुंब आहे. सुरुवातीला त्यांचे चिरंजीव येथील पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्रकुमार रामदास शेलकर हे आरोग्यसेवा देत आहे. आता तर डॉ राजेंद्रकुमार शेलकर व लता शेलकर यांच्या सुपुत्र डॉ विशाल राजेंद्रकुमार शेलकर हा नुकताच पार पडलेल्या एम बी बी एस च्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. म्हणजे दुसरी पिढी ही वैद्यकीय क्षेत्रात उतरली आहे.

डॉ. विशाल शेलकर यांचा मोठा भाऊ डॉ.तुषार राजेंद्रकुमार शेलकर हा देखील मागील वर्षी एम बी बीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला होता. रामदास शेलकर यांचे नातू मुलीचे मुलं व न प कर्मचारी संतोष महाजन यांचे चिरंजीव डॉ.उल्पेश संतोष महाजन (स्त्री रोग तज्ञ) तर दुसरा नातू डॉ.पंकज संतोष महाजन (M.D मेडिसिन) व तिसरा नातू डॉ.मयुर महाज (भूलतज्ञ)असून दोन नातसुना डॉ मीनाक्षी उपलेश महाजन (B.D.S) व डॉ.हर्षदा महाजन (B D.S) आहेत.या सर्व डॉक्टर परिवाराचे विशेष करून या परिवाराचे आधारवड तथा मार्गदर्शक माजी उपनगराध्यक्ष रामदास दौलत शेलकर या यांचे सर्व सामाजिक राजकीय शैक्षणिक स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

"आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा" हे ब्रीदवाक्य घेऊन आमच्या वर संस्काराचे धडे मिळाले. नुकताच झालेल्या एमबीबीएस परीक्षेत मी उत्तीर्ण होऊन स्वतःला सिद्ध केले आहे. कोरोना काळात आरोग्य सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. तळागाळातील गोरगरीब रुग्णापर्यत आरोग्यसेवा देण्यासाठी मी बांधील आहे.

डॉ.विशाल शेलकर एम.बी.बी.एस उत्तीर्णधारक, अमळनेर त !

संपादन- भूषण श्रीखंडे