सातबाऱ्यावरील कालबाह्य "बोझ्यांच"ओझं उतरणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Satbara

सातबाऱ्यावरील कालबाह्य "बोझ्यांच"ओझं उतरणार

अमळनेर : शेतकऱ्यांच्या (Farmers) शेत जमिनीवर प्रदीर्घ कालावधीपासून असलेले बोजे (Lone)कालबाह्य नोंदी कमी (Expired entries Satbara) करण्याबाबत आयुक्त राधाकृष्ण गमे (Commissioner Radhakrishna Game) यांनी संबंधित जिल्हाधिकारी (Collector) यांना दिले असून यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचे ठरणारे शेती व्यवहार करणे सुलभ होणार आहे.

हेही वाचा: जळगावातील मेडिकल हबचे काम मार्गी लागणार -वैद्यकीय शिक्षणमंत्री

अनेक शेतकऱ्यांच्या शेतीवर प्रदीर्घ काळापासून तगाई बोझे, बंडिंग बोझे, सावकारी बोझे, रद्द झालेल्या भूसंपदनाच्या नोंदी, आयटक बोझे, अस्तित्वात नसलेल्या संस्था व सोसायट्यांचे बोझे या नोंदी प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी विक्री, कर्ज प्रकरण , भूसंपादन मोबदला यासाठी कामकाजात अडचणी येत होत्या. तसेच शासनाकडून शेती सुधारणा साठी विहीर, तगाई, बैल तगाई, चारा तगाई, खावटी तगाई, ऑइल इंजिन तगाई, बी-बियाणे तगाई परतफेड करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना हप्ते ठरवून दिले होते. त्याची नोंद शेतकऱ्यांचा सात बारा उताऱ्यावर इतर हक्कात नोंदविण्यात आली होती. मात्र शासनाने तगाई विषयक कर्ज माफ केले आहे. तरीही बोझे दिसत असल्याने तलाठ्यांनी ते कमी करावेत. पूर्वीच्या काळी सावकारी कर्ज घेतले जात होते. त्याचे हप्ते फेडूनही नजर गहाण नोंदी नोंदविण्यात आल्या आहेत. अनेक संस्था बंद झाल्या आहेत तरी त्यांचेही बोझे शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर दिसत आहेत. म्हणून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणि अडचणी दूर करण्यासाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ते कमी करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना द्यावेत असे आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात २४ तासांत ५० मिलिमीटर पाऊस

शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

स्थानिक पातळीवर महसूल यंत्रणेने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून,मेळावे घेऊन योग्य मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांनी देखील ताबडतोब असे बोझे महसूल यंत्रणेच्या मदतीने कमी करून, येत असलेल्या अडचणी दूर कराव्यात.असे आवाहन माजी आमदारांनी शेतकऱ्यांना केले आहे.

Web Title: Marathi News Amalner Farmers Satbara Removal Entries Of Expired Loans Order By Commissioner

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top